महाराष्ट्र

नाना पटोलेंच्या कारला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न? भीषण अपघातानंतर काँग्रेसकडून घातपाताचा गंभीर आरोप

Swapnil S

भंडारा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. भंडाऱ्या जवळील भीलेवाडा गावाजवळ पटोलेंच्या गाडीला भरधाव ट्रकने धडक दिली. प्रचारसभा संपवल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास सुकळी या गावी परतताना मागून आलेल्या ट्रकने पटोले यांच्या उभ्या गाडीला जोरदार धडक दिल्याचे समजते. या धडकेत पटोलेंच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. तथापि, सुदैवाने पटोले मात्र अपघातातून बचावले. यानंतर नाना पटोलेंच्या गाडीचा अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. तर, स्वतः पटोले यांनीही ट्रकने मुद्दाम धडक दिल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे हा अपघात होता की घातपात याबाबत आता विविध चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसकडून घातपाताचा गंभीर आरोप -

"विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत." अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर देत लोंढे यांनी घातपाताची शक्यता वर्तवली. तसेच, त्यांनी आपल्या पोस्टमध्ये महाराष्ट्र पोलिसांनाही टॅग केले आहे.

मुद्दाम धडक दिली - पटोले

बुधवारी सकाळी स्वतः पटोले यांनीही अपघाताबाबत माध्यमांना माहिती दिली. "काल भंडाराजवळ एका ट्रकने आमच्या गाडीला मुद्दाम 'डॅश' (धडक) देण्याचा प्रयत्न केला आणि गाडीला एका बाजूने घासत नेले. मी तर सुखरूप आहे, पण गाडीचे मोठे नुकसान झाले. जनतेच्या प्रेमामुळे आणि आशिर्वादामुळे मी सुखरूप आहे. काळजी करू नये. घातपात आहे की काय याबाबत पोलिस चौकशी करतील, त्याबाबतची तक्रार दिली आहे.", असे पटोले म्हणाले.

नाना पटोले हे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी गेले होते. प्रचारानंतर परतत असताना हा अपघात झाला.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे