महाराष्ट्र

नाशिकमध्ये पुन्हा पक्षांतराचे वारे! डॉ. हेमलता पाटील दादांच्या राष्ट्रवादीत तर गुरमित बग्गा भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत

महापालिका निवडणूक जसजशी जवळ येतेय, तसतसे आपले राजकीय बस्तान बसवण्यासाठी विविध पक्षीय पुढे सरसावताना दिसत आहेत.

Krantee V. Kale

नाशिक : महापालिका निवडणूक जसजशी जवळ येतेय, तसतसे आपले राजकीय बस्तान बसवण्यासाठी विविध पक्षीय पुढे सरसावताना दिसत आहेत. नाशिकमध्ये आता नव्याने पक्षांतराचा एक टप्पा पार पडणार असल्याची चर्चा जोर धरून आहे. महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या डॉ. हेमलता पाटील उद्या मंगळवारी ( दि. १९ ) राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे अभ्यासू म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक गुरमित बग्गा भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. याशिवाय, पालिकेशी संबंधित आणखी काही चेहरे पक्षांतारच्या उंबरठ्यावर असल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघात 'मविआ' कडून डावलले गेल्याने कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देवून शिंदेसेनेत गेलेल्या डॉ. हेमलता पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेशकर्त्या होत आहेत. डॉ. पाटील कॉंग्रेसच्या राज्य प्रवक्त्याही राहिल्या आहेत. शिंदेसेनेत अधिक दिवस न रमता त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या भाजप प्रवेशाच्याही चर्चा झडत होत्या. अखेर त्यांनी राष्ट्रवादीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, माजी उपमहापौर गुरमित बग्गा, मनसेच्या माजी नगरसेविका नंदिनी बोडके आणि युवक कॉंग्रेसचे माजी शहरप्रमुख नरेश पाटील यांचीही नवे भाजप प्रवेशकर्त्यांत आहेत. भाजपमधील प्रवेश सोहळा कधी होतो, याबाबत मात्र अनिश्चितता आहे.

राज्यात १ मेपासून परवानाधारक रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्यांचे परवाने रद्द करणार - सरनाईक

३६ तासांच्या 'बंद'नंतरही ठाण्यात कमी दाबानेच पाणी; ऐन उन्हाळ्यात पाणीबंदीने नागरिक हैराण

रुग्णालयच आता होणार अर्जदार! अर्जमंजुरीची प्रक्रिया ८ तासांत; सीएम सहाय्यता निधीची नवीन प्रणाली

'व्हायरल'च्या नादात मर्यादा ओलांडल्या! भररस्त्यात तरुणीशी गैरवर्तन; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची धडाकेबाज कारवाई

रांजणगाव महागणपती मंदिर डागडुजीसाठी तीन महिने बंद