नाशिक टीसीएस प्रकरण : पीडितेला ‘हनिया’ नाव देत मलेशियाला पाठवण्याचा कट; धक्कादायक तपशील उघड 
महाराष्ट्र

नाशिक टीसीएस प्रकरण : पीडितेला ‘हनिया’ नाव देत मलेशियाला पाठवण्याचा कट; धक्कादायक तपशील उघड

टीसीएस कंपनीशी संबंधित लैंगिक छळ आणि कथित धर्मांतर प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.

Swapnil S

नाशिक : टीसीएस कंपनीशी संबंधित लैंगिक छळ आणि कथित धर्मांतर प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. धर्मांतराशी संबंधित काही कागदपत्रांचा संबंध मालेगाव शहराशी असल्याचे समोर आले असून, संशयितांनी पीडित तरुणीचे नाव बदलून ‘हनिया’ ठेवले होते. तसेच तिला मलेशियाला पाठवण्याचा कट रचला असल्याची माहिती न्यायालयीन सुनावणीत उघड झाली.

सोमवारी नाशिक रोड न्यायालयात संशयित निदा खान हिच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी अभियोक्ता अजय मिसर यांनी न्यायालयात गंभीर आरोप मांडले. पीडितेला धर्मपरिवर्तनासाठी प्रचंड दबाव टाकण्यात आला होता, असा युक्तिवाद त्यांनी केला.

अभियोक्त्यांनी पुढे सांगितले की, पीडितेच्या मोबाईलमध्ये धर्मांतराशी संबंधित व्हिडीओ (रील्स) टाकण्यात आले, तिला रोजा पाळण्यास भाग पाडण्यात आले, तसेच हिजाब वापरण्याचे प्रशिक्षण संशयितांच्या घरी देण्यात आले. पीडिता विवाहित असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला ‘हनिया’ असे नाव देत मलेशियाला पाठवण्याचा कट आखण्यात आला होता, असेही न्यायालयात सांगण्यात आले.

मोबाईलमधील माहिती

मालेगावमध्ये धर्मांतराशी संबंधित काही कागदपत्रांशी जोडलेल्या लिंक सक्रिय असल्याचेही अभियोक्त्यांनी नमूद केले. संशयित निदा खान हिच्या मोबाईलमध्ये महत्त्वाची माहिती दडलेली असून न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून त्याचे विश्लेषण झाल्यास आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

एकाच कंपनीतील समान स्वरूपाच्या नऊ घटनांसाठी स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याऐवजी एकाच गुन्ह्यांतर्गत तपास करणे शक्य आहे. तसेच महाराष्ट्रात स्वतंत्र धर्मांतरविरोधी कायदा नसताना सरकारी पक्ष कोणत्या कायदेशीर तरतुदींनुसार आरोप करत आहे.
राहुल कासलीवाल, बचाव पक्षाचे वकील

मुंबईत १ लाख झाडे लावण्याचा संकल्पच महापौर रितू तावडे यांच्याकडून हरित मुंबई अभियानाला गती

Navi Mumbai : पाणी बचतीसाठी कठोर उपाययोजना; अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा; वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंदचे आदेश

'नहीं बोलूंगा मराठी!'; मुंबई सेंट्रल स्थानकावरील चौकशी कक्षात रेल्वे कर्मचाऱ्याची अरेरावी, VIDEO व्हायरल

Ambernath : घरात CCTV लावून ठेवायचा पाळत; लग्नानंतर ४८ दिवसांत विवाहितेची आत्महत्या; डॉक्टर पतीसह तिघांना अटक

मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला गती मिळणार; प्रकल्पांसाठी 'एमआरव्हीसी'ला हवेत ६४,६४४ कोटी