प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Palghar : अघोरी उपायांच्या नावाखाली अल्पवयीन मुलीला जंगलात नेलं; ५५ वर्षीय भोंदू बाबाकडून अत्याचार

पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १३ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे. गावठी औषध देण्याच्या आणि अघोरी उपायांच्या बहाण्याने एका ५५ वर्षीय भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीला जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केले आहेत.

Krantee V. Kale

डहाणू : पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १३ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे. गावठी औषध देण्याच्या आणि अघोरी उपायांच्या बहाण्याने एका ५५ वर्षीय भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीला जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केले आहेत. पीडित मुलीने या घटनेविषयी आपली बहीण आणि कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी ४ मे रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास कासा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत ५ मे रोजी पहाटे चार वाजता आरोपी शिवराम परश सावर याला राहत्या घरातून ताब्यात घेतले. तर पीडित मुलगी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

पीडितेच्या बहिणीला आजारपणामुळे गावठी औषध हवे असल्यामुळे ३० एप्रिल रोजी नातेवाईकांनी औषध देणाऱ्या भोंदू बाबाला संपर्क केला होता. त्यानंतर ३ मे रोजी आरोपीने पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना औषध घेण्यासाठी बोलावले. औषध देण्याच्या बहाण्याने ४ मे रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास आरोपीने पीडितेला चरी पावण येथील जंगलातील निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले आणि याविषयी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पुढील तपास जव्हार उपविभागीय पोलिस अधिकारी समीर मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील करत आहेत.

Mumbai : २३८ एसी लोकल ४ वर्षे आधीच मिळणार; तीन कारखान्यांत एकाच वेळी उत्पादन; नवी लोकल पुढील वर्षी होणार दाखल

मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेवर 'जीन्सराज'; महामार्गच बनला 'जीन्स सुकवण्याचा अड्डा'!

Baramati : "बी. फार्मसीचं शिक्षण घेतलंय, पण नोकरी करू देत नव्हता"; पतीला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचा खुलासा

'डीजे लावणी', अश्लील डान्सवर तातडीने बंदी घाला! चित्रपट महामंडळाची सरकारकडे मागणी

बस्तर सफरीवर निघालेल्या मुंबईच्या २४ वर्षीय बायकरचा अपघातात मृत्यू; १५ तासांपूर्वी केली होती 'लेट्स एक्सप्लोर बस्तर' पोस्ट