महाराष्ट्र

PCMC : भरधाव कारच्या छतावर स्टंटबाजीचं 'बक्षीस', पिंपरी-चिंचवड पोलिसांची भन्नाट पोस्ट

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव कारच्या छतावर बसून स्टंटबाजी करणे दोन तरुणांना महागात पडले

Swapnil S

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव कारच्या छतावर बसून स्टंटबाजी करणे दोन तरुणांना महागात पडले आहे. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात तर घेतलेच. शिवाय, कारही जप्त केली आणि त्यासोबत, कारवाईचा फोटो आणि स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून ‘बक्षीस’ दिले असेही म्हटले आहे.

प्रतिक सुशिल शिंगटे (वय २४), ओमकार कृष्णा मुंढे (वय २०, दोघे रा. निगडी) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. दोघेही गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता चिंचवड येथील केएसबी चौकामध्ये भरधाव कार चालवत स्टंटबाजी करत होते. शिंगटे गाडी चालवत होता. तर, मुंढे छतावर बसून स्टंटबाजी करत होता. काहींनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर तो व्हायरल झाला, त्यानंतर पोलिसांनी शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर, आम्ही त्यांना त्यांच्या साहसी खेळासाठी 'बक्षीस' दिले असे लिहून एक सोशल मीडिया पोस्ट देखील केली.

दोघांवर आयपीसी कलम २७९, ३३६ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९, १७७ अंतर्गत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून वाहन देखील जप्त करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी अशी स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी! मिळणार ५०० चौरस फुटांचे घर; शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा