महाराष्ट्र

PM Modi in Nagpur : महाराष्ट्रात पंतप्रधानांचे आगमन; केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक

प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज अनेक विकासकामांच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रात असणार आहेत. समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Express Highway) नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते नागपुरात झाले. तसेच, त्यांनी नागपूर- बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजनाचा महाराष्ट्रात आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेदेखील यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या हस्ते आज महाराष्ट्रातील ७५,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी नागपूर मेट्रोच्या फेज दोनचे भूमीपूजन केले. यावेळी त्यांनी नागपूर मेट्रोने प्रवासदेखील केला. मेट्रो प्रवासादरम्यान पंतप्रदान मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः समृद्धी महामार्गावरच्या प्रवासाचा अनुभव घेतला.

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग