महाराष्ट्र

सागरी साहसी जलतरणपटूंचा प्रणिता देवरे-चिखलीकर यांच्याकडून गौरव

आयोजित करण्यात आलेल्या गौरव कार्यक्रमात प्रणिता देवरे - चिखलीकर यांनी जलतरणपटूंना भावी आयुष्यासाठी ही शुभेच्छा दिल्या.

Swapnil S

नांदेड : सागरी साहसी जलतरणपटूंनी ऐतिहासिक शहर सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या १३व्या राज्यस्तरीय समुद्री जलतरण आणि साहसी प्रकारातील स्पर्धेत नांदेडचे नाव उज्वल केल्याबद्दल या जलतरणपटूंचा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे - चिखलीकर यांनी गौरव केला.

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गौरव कार्यक्रमात प्रणिता देवरे - चिखलीकर यांनी जलतरणपटूंना भावी आयुष्यासाठी ही शुभेच्छा दिल्या. रिवांशू बिंगेवार, नवनाथ सावरगावे, राजेश सोनकांबळे, राजेंद्र ताटे, गंगाधर पवार, अजिंक्य नरवाडे, मयूर केंद्रे, आदित्य राजुरे, ऋषिकेश बेंबडे, विश्व रेवनवार, जीनल बिंगेवार, रुद्र गंधेवार, मनन सावरगावे, आरोही मोगले यांच्यासह अनेक जलतरणपटूंचा व प्रशिक्षक यांचा त्यांनी यावेळी गौरव केला.

नांदेड शहर आणि जिल्हाभरातून साहसी धाडसी जलतरणपटू तयार व्हावेत, यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून जलतरणीके संबंधित असणाऱ्या अडीअडचणी दूर करून तेथे चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असा विश्वास ही प्रणिता देवरे - चिखलीकर यांनी यावेळी जलतरणपटूंना आणि त्यांच्या पालक, प्रशिक्षकांना दिला.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप