महाराष्ट्र

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २ ते ४ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्राला भेट देणार आहेत, असे राष्ट्रपती भवनातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २ ते ४ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्राला भेट देणार आहेत, असे राष्ट्रपती भवनातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

सोमवार २ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वारणानगर, कोल्हापूर येथे श्री वारणा महिला सहकारी समुहाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार ३ सप्टेंबर रोजी पुणे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या (डीम्ड युनिव्हर्सिटी) २१ व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मुंबई येथे महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होतील.

बुधवार ४ सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते उदगीर, लातूर येथील बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार आहे. उदगीर येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यालाही त्या मार्गदर्शन करणार आहेत.

शिक्षण क्षेत्रातील विषमता आणि आंबेडकर

राक्षसी बहुमतापेक्षा मोठी जनशक्ती

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा