पुणे दारूकांडप्रकरणी २२ अधिकारी निलंबित; ५५ ठिकाणी छापे, ५० जण ताब्यात, बळींची संख्या २२ 
महाराष्ट्र

पुणे दारूकांडप्रकरणी २२ अधिकारी निलंबित; ५५ ठिकाणी छापे, ५० जण ताब्यात, बळींची संख्या २२

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाने शनिवारी संध्याकाळपर्यंत २२ जणांचा बळी घेतला असून, केवळ ६,६०० रुपयांच्या अतिरिक्त फायद्यासाठी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने हा सगळा प्रकार केल्याचे तपासात उघड झाले आहे.

Swapnil S

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाने शनिवारी संध्याकाळपर्यंत २२ जणांचा बळी घेतला असून, केवळ ६,६०० रुपयांच्या अतिरिक्त फायद्यासाठी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने हा सगळा प्रकार केल्याचे तपासात उघड झाले आहे. या भीषण घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, हलगर्जीपणा दाखवणाऱ्या २२ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने मोहीम राबवून ६४५ लिटर विषारी दारू जप्त केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यावर यापूर्वीही ३ गुन्हे दाखल असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या ५ जण अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत असून, पोलिसांनी आतापर्यंत ५० हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे आणि ५५ ठिकाणी छापे टाकले आहेत.

या खळबळजनक प्रकरणाची पाळेमुळे उरळी कांचनपासून सुरू होतात. राधेश्याम प्रजापती हा उरळी कांचनमध्ये हातभट्टीची दारू तयार करण्याचे काम करत असे, ज्याच्याकडून योगेश वानखेडे ही दारू विकत घेऊन वेगवेगळ्या गुत्त्यांवर पुरवत असे. अधिक नफा मिळवण्याच्या हव्यासापोटी वानखेडेने २३ मे रोजी पहिल्यांदाच मिथेनॉलचा वापर करण्याचा जीवघेणा प्रयोग केला.

ही विषारी दारू पिंपरीतील फुगेवाडी येथील कर्नेलसिंग विरका (सरदारजी), त्याची पत्नी इंदरजित आणि मुलगा विक्की विरका यांच्या माध्यमातून विकली गेली. तसेच खडकीतील अग्रवाल, वडारवाडीतील धोत्रे आणि हडपसर-काळेपडळ भागातील आकाश जाधव व अशोक हांडे यांनी ही दारू ग्राहकांना उपलब्ध करून दिली होती. ही दारू शरीरात गेल्यावर अत्यंत घातक ठरली. कुजलेला गूळ आणि उसाच्या मळीपासून बनवलेल्या या दारूत नशा वाढवण्यासाठी नवसागर, युरिया, ऑक्सिटोसिन आणि प्रमाणाबाहेर मिथेनॉल मिसळल्याने ती विषात बदलली. दारू प्यायल्यानंतर मळमळणे, उलट्या होणे, दृष्टी अधू होणे आणि तोंडाला फेस येणे अशी लक्षणे मृतांमध्ये दिसून आली. अवघ्या काही तासांतच या विषारी रसायनाने यकृत आणि किडन्या निकामी केल्याने अनेकांचा तडफडून मृत्यू झाला. उरळी कांचनमधील ३२ वर्षीय रिक्षाचालक उमेश अवचर याचाही अशाच प्रकारे मळमळ आणि उच्च रक्तदाबाने मृत्यू झाला. कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

या घटनेनंतर प्रशासनाने आक्रमक पावले उचलली आहेत. हडपसर आणि फुगेवाडी परिसरात २२ मृत्यू झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ६४५ लिटर विषारी दारूचा साठा जप्त केला, ज्यामध्ये हडपसरमधून ७० लिटर, दापोडीतून १५५ लिटर आणि गोखलेनगरमधून ४२० लिटर जप्त केलेल्या दारूचा समावेश आहे. या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याचे अधीक्षक अतुल कानडे यांनी सांगितले.

२२ जणांवर निलंबनाची कारवाई

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे १३ अधिकारी (३ निरीक्षक, ६ दुय्यम निरीक्षक आणि ४ जवान) निलंबित केले आहेत. तर पुणे पोलिसांच्या हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, एपीआय सिकलगर आणि पीएसआय मुलानी यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील दापोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे आणि त्यांच्या पथकातील ५ कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

५० हून अधिकजण ताब्यात

या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यावर यापूर्वीही ३ गुन्हे दाखल असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या ५ जण अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत असून, पोलिसांनी आतापर्यंत ५० हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे आणि ५५ ठिकाणी छापे टाकले आहेत.

अवघ्या ६,६०० रुपयांच्या नफ्यासाठी घडले दारूकांड

मिथेनॉल आणि ९,५०० रुपयांचे गावठी दारूचे ५ ड्रम विकत घेतले. या ५ ड्रममध्ये पाणी मिसळून १० ड्रम केले आणि त्यात मिथेनॉल मिसळून एकूण १२ ड्रम तयार केले. हा सर्व साठा त्याने ३३,६०० रुपयांना विकला, ज्यातून त्याला केवळ ६,६०० रुपयांचा नफा झाला, मात्र या अल्प फायद्यासाठी त्याने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन