महाराष्ट्र

Pune Porsche Car Accident: बाल न्याय मंडळाचे 'ते' दोन सदस्य बडतर्फ

पुण्यातील कल्याणीनगर, भागात १९ मे रोजीच्या मध्यरात्री बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार भरधाव वेगाने चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या दोन आयटी अभियंत्यांना उडवले होते.

Swapnil S

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या 'हिट अँड रन' प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन त्या अल्पवयीन आरोपीची तत्काळ जामिनावर सुटका करणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाच्या दोन सदस्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. एल. एन. धनवडे आणि कविता थोरात अशी या दोन सदस्यांची नावे आहेत.

पुण्यातील कल्याणीनगर, भागात १९ मे रोजीच्या मध्यरात्री बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार भरधाव वेगाने चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या दोन आयटी अभियंत्यांना उडवले होते. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अनिश अवधिया (२७ वर्षे) आणि अश्विनी कोष्टा अशी अपघातामध्ये जागीच मृत्यू झालेल्यांची नावे होती. अपघातात गाडीचा वेग इतका भरधाव होता की अश्विनी कोस्टा ही तरुणी १५ फूट दूर फेकली गेली.

या प्रकरणी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक करून बाल हक्क न्याय मंडळासमोर हजर केले होते. अल्पवयीन मुलाला घटनेच्या अवघ्या १५ तासांत ३०० शब्दांच्या निबंध लेखनासह काही अटी घालत जामीन मंजूर करण्यात आला होता. हा जामीन ज्यांनी दिला, त्या बाल न्याय मंडळाच्या दोन शासकीय सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस महिला आणि बालविकास विभागाने सरकारकडे केली होती. अल्पवयीन आरोपीच्या जामिनाच्या निर्णयावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. बालन्याय मंडळाच्या वादग्रस्त निर्णयानंतर महिला व बालकल्याण विभागाने या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. त्यानंतर आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला होता.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी