Pune : फटाक्यांच्या वादावरून तरुणावर हल्ला; तिघांना अटक प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Pune : फटाक्यांच्या वादावरून तरुणावर हल्ला; तिघांना अटक

दिवाळीत फटाके उडविण्यावरून झालेल्या वादातून विमाननगर परिसरात तिघांनी एका २२ वर्षीय तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण केली.

Swapnil S

पुणे : दिवाळीत फटाके उडविण्यावरून झालेल्या वादातून विमाननगर परिसरात तिघांनी एका २२ वर्षीय तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अमन शेख गंभीर जखमी झाला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

राम नवले (१९), तेजस शिंदे (२०) आणि सम्यक साळवी (१८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विमाननगरमधील रोझ गार्डन सोसायटी रस्त्यावर अमन आणि त्याचे मित्र फटाके उडवत होते. त्याचवेळी जवळच फटाके उडविणाऱ्या दुसऱ्या गटाशी त्यांचा वाद झाला. या वादातून आरोपींनी अमनला दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी अमनचे वडील समीर शेख यांनी फिर्याद दिली आहे.

दरम्यान, गुरुवार पेठेतील पंचहौद मिशनजवळील भंडारी वाड्याला फटाक्यामुळे आग लागली. मोडकळीस आलेल्या या वाड्यात कोणीही राहत नव्हते. अरुंद गल्लीतील दाट वस्तीत असलेल्या वाड्याची संभाव्य पडझड लक्षात घेऊन वीजपुरवठाही खंडित करण्यात आला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI वापरणाऱ्या दुकानदारांसाठी खूशखबर! NPCI ने आणली शानदार स्कीम, कसा होणार फायदा? वाचा सविस्तर

एम.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय ठाण्यात; प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या परिसरात महाविद्यालयाला मान्यता

भाडेकरू फ्लॅट खाली करत नाहीये? आता मनमानी चालणार नाही; मुंबई पोलिसांकडून पहिल्यांदाच घराचा ताबा सोडण्याचे आदेश

Mumbai : नव्या सभागृहाचा मार्ग मोकळा! ३२९ नगरसेवकांसाठी प्रशस्त सभागृह उभारण्यास स्थायीची मंजुरी

ठाणे स्थानकातील सरकते जिने प्रवाशांसाठी गैरसोयीचे; १२ डब्यांच्या लोकलमधील प्रवाशांची फरफट, फलाट ५ आणि ६ वरील नियोजनावर प्रश्नचिन्ह