Raigad : विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय; पतीला अटक, चौघांवर गुन्हा दाखल  
महाराष्ट्र

Raigad : विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय; पतीला अटक, चौघांवर गुन्हा दाखल

पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथील रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मुरलीधर दरेकर यांची सून गार्गी गणेश दरेकर हिचा गळफास लावून मृत्यू झाल्याप्रकरणी तिला आत्महत्या करण्यात प्रवृत्त केल्याचा पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

पोलादपूर : तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथील रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मुरलीधर दरेकर यांची सून गार्गी गणेश दरेकर हिचा गळफास लावून मृत्यू झाल्याप्रकरणी तिला आत्महत्या करण्यात प्रवृत्त केल्याचा पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलिसांनी तिचा पती गणेश मुरलीधर दरेकर यांच्यासह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून पतीला पोलिसांनी अटक करुन महाड न्यायालयात हजर केले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

राजिपचे माजी सदस्य मुरलीधर दरेकर यांच्या घरी मुलगा घराबाहेर गेला असताना सुन गार्गी गणेश दरेकर हिने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून गळफास लावून घेतल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे दिसून आले. यावेळी विवाहितेचा भाऊ प्रथमेश दळवी याने बहिणीचा मृतदेह पाहून पोलादपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या फिर्यादीनुसार मृत गार्गीच्या मृत्यूप्रकरणी आरोपी पती गणेश मुरलीधर दरेकर, मुरलीधर दरेकर, मनीषा दरेकर, मुन्नी पार्टे, श्रीकांत पार्टे यांनी शारीरिक, मानसिक तसेच वेळोवेळी पैशाची मागणी करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. या गुन्ह्यातील आरोपी गणेश मुरलीधर दरेकर नुकतीच अटक करण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Mumbai : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण; १४ हजार लुटले, तिघा सराईत गुन्हेगारांना अटक

सर्वोच्च न्यायालयावर दबावाचा प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mumbai : कोस्टल रोडच्या भरावात अनधिकृत मातीचा वापर; कंत्राटदाराला पालिकेची नोटीस

रॉबर्ट हॉल, मायकेल वूडफर्ड यांना अर्थशास्त्राचे नोबेल