रायगड : जंजिरा किल्ला उद्यापासून पर्यटकांसाठी खुला 
महाराष्ट्र

रायगड : जंजिरा किल्ला उद्यापासून पर्यटकांसाठी खुला

किल्ला पर्यटकांसाठी खुला होत नसल्याने पर्यटक नाराज होऊन परत जात होते. त्यामुळे येथील रोजगारावर मोठा परिणाम होत होता.

Swapnil S

मुरुड जंजिरा : मुरुड येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी १४ ऑक्टोबरपासून खुला होणार आहे. गेल्या दीड महिन्यापासून स्वच्छतेच्या कामामुळे पर्यटकांसाठी बंद ठेवला होता. ही बाब खासदार सुनील तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संवर्धक अधिकारी बजरंग येलीकर यांना किल्ला सुरू करण्याचे निर्देश दिले.

किल्ला पर्यटकांसाठी खुला होत नसल्याने पर्यटक नाराज होऊन परत जात होते. त्यामुळे येथील रोजगारावर मोठा परिणाम होत होता.

सुमारे २२ एकर क्षेत्रावर पसरलेला आणि सुमारे ४० फूट उंच तटबंदीने वेढलेला जंजिरा किल्ला हे रायगड जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या किल्ल्याला भेट देतात. पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाकडून किल्ला बंद ठेवण्यात येतो.

पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पुरातत्त्व विभागाने किल्ल्याचे दरवाजे बंद ठेवून चारही बाजूंना कामगार लावून स्वच्छतेचे काम सुरू केले. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून हे काम सुरू असल्याने किल्ला पर्यटकांसाठी खुला होण्यास विलंब होत होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Mumbai : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण; १४ हजार लुटले, तिघा सराईत गुन्हेगारांना अटक

सर्वोच्च न्यायालयावर दबावाचा प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mumbai : कोस्टल रोडच्या भरावात अनधिकृत मातीचा वापर; कंत्राटदाराला पालिकेची नोटीस

रॉबर्ट हॉल, मायकेल वूडफर्ड यांना अर्थशास्त्राचे नोबेल