Twitter/@Dev_Fadnavis 
महाराष्ट्र

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची शिवतीर्थवर भेट ; नेमकी काय चर्चा ?

शिवतीर्थ या निवासस्थानाचे काम पूर्ण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी तिथे जाऊन पाहुणचार स्वीकारला होता

प्रतिनिधी

आज सकाळीच राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली ती देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीची... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली. दोघांमध्ये सुमारे तास-दीड तास चर्चा झाली. दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी फडणवीस शिवतीर्थावर गेल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या दोघांच्या भेटीदरम्यान आगामी महापालिका निवडणुकीबाबत काहीतरी शिजत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी कौतुकाचे पत्र लिहिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. आज देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, यात्रेदरम्यान राज ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांची चौकशी करण्याची योजना आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. यावेळी त्यांना भेटणे शक्य नसल्याने फडणवीस त्यांना भेटायला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

याआधी देखील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाचे काम पूर्ण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी तिथे जाऊन पाहुणचार स्वीकारला होता. शिवसेनेचे भाजपपासून दूर गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्री वाढताना दिसत आहे. आता शिवसेनेचा एक पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. आता या दोन नेत्यांच्या भेटीत काय चर्चा झाली याची उत्सुकता कमालीची वाढत आहे.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

भारत-भूतान रेल्वेमार्गाने जोडणार; प्रकल्पाचा संयुक्त आराखडा जाहीर

पीडितांकडे न्यायालयाचे दुर्लक्ष नको; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू; केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान