मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. पत्रात राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. हे पत्र ट्विट करून राज ठाकरे यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
मागील अनुभव पाहता शासन पंचनामा करण्याचे आदेश देते. मात्र प्रशासकीय स्तरावर पंचनामे योग्य पद्धतीने होत नसल्याने गरजू शेतकरी कायमच दुर्लक्षित राहतात. त्यामुळे सरकारने या परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. लॉकडाऊननंतर शेतकऱ्यांची दिवाळी आणखी भव्य व्हावी यासाठी सरकारने लक्ष घालावे, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे. प्रति हेक्टरी दिलेली भरपाईची रक्कम पुरेशी नसल्याचेही त्यांनी नमूद केले.