महाराष्ट्र

रत्नागिरीवासीयांवर पाणी कपातीचे संकट

Swapnil S

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात पाणीटंचाईमुळे आठवड्यातून दोन वेळा पाणी कपात केली जात आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेता गतवर्षीप्रमाणे १५ एप्रिलपासून एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. लवकरच त्या संदर्भात सूचना जारी करण्यात येणार आहे.

सध्या पानवल धरणातून रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा होऊ शकत नाही. या धरणातून पाणीपुरवठा पुन्हा सुरू व्हावा, यासाठी योजना हाती घेण्यात आली आहे. शीळ धरणातील पाणी पातळीकडे नगरपरिषद प्रशासन लक्ष ठेवून आहे. दैनंदिन जलपातळी आणि जूनपर्यंत करावा लागणारा पाणीपुरवठा याचा विचार करता एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या संदर्भात नागरिक सूचना येत्या दोन ते तीन दिवसाच्या जाहीर होणार आहे. पाणीसाठा पातळीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून १५ एप्रिलपासून पाणीपुरवठा संदर्भातील नवीन वेळापत्रक येत्या दोन-तीन दिवसात जाहीर केले जाईल असे नगरपरिषद पुरवठा अभियंता अविनाश भोईर यांनी स्पष्ट केले आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल