रामदास आठवले यांचे संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

रिपब्लिकन पक्षाला मंत्रिपदाची आस; महायुतीचा घटक पक्ष म्हणून आठवले यांचा दावा

राज्यातील जनतेने महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री निश्चित होईल. मुख्यमंत्री कोणीही होवो, मात्र मुख्यमंत्री हा महायुती सरकारचा राहील.

Swapnil S

मुंबई : राज्यातील जनतेने महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री निश्चित होईल. मुख्यमंत्री कोणीही होवो, मात्र मुख्यमंत्री हा महायुती सरकारचा राहील. रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असल्याने महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद द्यावे तसेच महामंडळाचे अध्यक्ष पदे, उपाध्यक्ष पदे व विधान परिषद सदस्यत्व द्यावे, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

भाजप संभाव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामदास आठवले यांनी सागर बंगल्यावर भेट घेऊन सत्ता वाटपात रिपब्लिकन पक्षालाही वाटा मिळावा, अशी मागणी केली आहे.

आठवले यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात महायुतीचा महाविजय करण्यात सर्वच घटक पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचे १३२ निवडून आले आहेत. त्यामुळे राज्यात भाजपचा गोटातून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी होत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे हे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. आता मात्र भाजपकडे आमदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेते काय निर्णय घेतात त्यावर पुढील वाटचाल आहे. महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद निश्चित द्यावे. एक विधान परिषद सदस्यत्व द्यावे. २ महामंडळाची अध्यक्षपदे, २ उपाध्यक्षपदे आणि काही कार्यकर्त्यांना महामंडळाची संचालकपदे द्यावीत, या मागणीचा पुनरुच्चार आठवले यांनी केला.

मराठ्यांच्या ओबीसीकरणाचे पेच

आरोप-प्रत्यारोपात महाराष्ट्राचा विकास भरकटतोय

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण