(संग्रहित छायाचित्र) 
महाराष्ट्र

मुंबई ते विदर्भ अजून सुसाट! समृद्धी महामार्गाचा होणार विस्तार; 'या' तीन जिल्ह्यांना फायदा

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाचा चंद्रपूर, गोंदिया आणि भंडाऱ्यापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. समृद्धी महामार्गाच्या विस्तारासाठी नियोजित तीन महामार्गांच्या निविदा प्रक्रियेला इन्फ्रा कंपन्यांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला ४६ निविदा प्राप्त झाल्या आहेत.

राज्य सरकारने समृद्धी महामार्ग चंद्रपूर, गोंदिया आणि भंडाऱ्यापर्यंत नेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार समृद्धीचा तीन महामार्गाच्या माध्यमातून विस्तार केला जाणार आहे. यात नागपूर-चंद्रपूर महामार्गासाठी २२ निविदा प्राप्त झाल्या आहेत. नागपूर-चंद्रपूर हा १९४ किलोमीटरचा महामार्ग सहा टप्प्यात तयार केला जाणार आहे. या महामार्गाच्या विविध टप्प्यांसाठी अँफकाँन इन्फ्रा, जीआर इन्फ्रा, एनसीसी, माँटेकार्लो, गवार कन्स्ट्रक्शन, एचजी इन्फ्रा, पीएनसी इन्फ्रा, पटेल इन्फ्रा, बीएससीपीएल इन्फ्रा या कंपन्यांनी निविदा सादर केली आहे.

समुद्धीच्या विस्तारात नागपूर, गोंदिया या १६२ किलोमीटरच्या महामार्गाची उभारणी केली जाणार आहे. हा महामार्ग चार टप्प्यात तयार केला जाणार असून यात अँफकॉन इन्फ्रा, जी. आर. इन्फ्रा, माँटेकार्लो, एनसीसी, अँपको इन्फ्रा, जीआर इन्फ्रा, पीएनसी इन्फ्रा, ओरिएंटल स्ट्रक्चरल इजिनिअरींग अशा कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत.

समृद्धी महामार्गाला भंडारा गडचिरोलीपर्यंत महामार्गाच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. हा महामार्ग १४२ किलोमीटर इतका लांबीचा आहे. यासाठी गवार कन्स्ट्रक्शन, जी.आर इन्फ्रा, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स, पटेल इन्फ्रा या कंपन्यांनी निविदा सादर केली आहे. तांत्रिक निविदांमध्ये कंपन्यांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता समृद्धीच्या विस्ताराचे काम लवकरच सुरु होण्याचा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. समृद्धी महामार्गाच्या विस्ताराने विदर्भातील इतर जिल्ह्यांमधील विकासाला चालना मिळणार आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त