महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावरील प्रवाशांना दिलासा; १४ नवे फूड प्लाझा सुरू होणार, जाणून घ्या माहिती

अवघ्या आठ तासांत नागपूर ते मुंबई प्रवास शक्य करून देणाऱ्या समृद्धी महामार्गावर स्वच्छतागृह, पेट्रोल पंप आणि खाण्यापिण्याच्या सुविधांचा अभाव अशी प्रवाशांची तक्रार होती. मात्र आता...

किशोरी घायवट-उबाळे

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या आठ तासांत नागपूर ते मुंबई प्रवास शक्य करून देणाऱ्या या महामार्गावर प्रवाशांना आतापर्यंत मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. स्वच्छतागृह, पेट्रोल पंप आणि खाण्यापिण्याच्या सुविधांचा अभाव ही प्रवाशांची तक्रार होती. मात्र आता या समस्यांवर तोडगा निघण्याची शक्यता असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) पुढील तीन महिन्यांत तब्बल २२ फूड प्लाझा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या २२ फूड प्लाझांपैकी ८ फूड प्लाझा आधीच सुरू झाले असून, उर्वरित १४ फूड प्लाझा येत्या तीन महिन्यांत सुरू होणार आहेत.

सध्या कार्यरत असलेले ८ फूड प्लाझा कुठे आहेत?

सध्या समृद्धी महामार्गावर वरगडी आणि मराळ येथे दोन्ही बाजूंनी, तर मांडवा, वायफळ, मानकापूर आणि आमणे येथे एका बाजूने फूड प्लाझा सुरू झाले आहेत.

पुढील तीन महिन्यांत कुठे सुरू होणार १४ नवे फूड प्लाझा?

अहवालानुसार, मानकापूर, मांडवा, वायफळ आणि आमणे येथे विरुद्ध बाजूंनी फूड प्लाझाचे काम सुरू आहे. तसेच दवाळा, गणेशपूर, शिवनी, ताथोड, अखतवाडा, दव्हा, डोणगाव, पोखरी, अनंतपूर आणि कडवांची या ठिकाणी दोन्ही बाजूंनी फूड प्लाझा उभारले जाणार आहेत. हे सर्व २२ फूड प्लाझा सुरू झाल्यानंतर समृद्धी महामार्गावरील प्रवास अधिक सुलभ होणार असून, शौचालये, पिण्याचे पाणी, अन्न आणि इंधन सुविधांचा अभाव दूर होणार आहे.

१६ वरून २२ फूड प्लाझा कसे झाले?

सुरुवातीला MSRDC ने महामार्गावर १६ फूड प्लाझा उभारण्याची योजना आखली होती आणि त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या होत्या. मात्र २०२३ पासून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही योजना रखडली होती. त्यानंतर निविदांना प्रतिसाद मिळाला आणि काम सुरु करण्यात आले आहे. आता फूड प्लाझांची संख्या १६ वरून २२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

ऐन हिवाळ्यात पावसाचं आगमन! सात जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMD चा इशारा, पुढील २४ तास ढगाळ वातावरण

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

तिजोरीत खडखडाट, विविध कामांचा आराखडा कागदावरच; महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचा आरोप

तुमची ओळख 'चेहरा' पटवणार; 'आधार'मध्ये मोठे बदल घडण्याची तयारी सुरू

Mumbai : विक्रोळीत निष्काळजीपणामुळे लाऊडस्पीकर कोसळून ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, CCTV फुटेज व्हायरल