संजय राऊत  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

निवडणुकांसाठी भाजप-एमआयएमची छुपी युती; संजय राऊतांचा हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, "मुस्लिम मतांसाठी भाजप एमआयएमची...

किशोरी घायवट-उबाळे

शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत बुधवारी (दि.७) विविध विषयांवर भाष्य केले. महापालिका निवडणुकांसाठी भाजप-एमआयएमची छुपी युती असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.

भाजप आणि एमआयएमची छुपी युती

भाजपने अनेक महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांसोबत युती केली. असे सांगत महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपने महाराष्ट्रभर एमआयएमला पाठिंबा दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. “अकोटपासून मीरा-भाईंदरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि एमआयएमची छुपी युती आहे, काही ठिकाणी ती उघड आहे,” असे म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

भाजपचं ब्लॅकमेल करण्याचं राजकारण

पुढे ते म्हणाले, "भाजपने सगळ्यांच्याच बाबतीत ब्लॅकमेल करण्याचं राजकारण चालू ठेवलं आहे. अजित पवारांना ब्लॅकमेल करून तुम्ही राष्ट्रवादी फोडली. एकनाथ शिंदे आणि ४० लोकांना ब्लॅकमेल करून फोडलं. अशोक चव्हाण यांना ब्लॅकमेल केलंत. तुमचा (भाजपचा) धंदा हा ब्लॅकमेलिंगचा आहे." अशी टीका संजय राऊत यांनी केली.

राज्याकडे दुर्लक्ष करून ते फिरतायेत

राज्याच्या कारभारावर टीका करताना राऊत म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री हे राज्याकडे दुर्लक्ष करून फिरतीवर आहेत. अजित पवार भाजपला शिव्या देत फिरत असतानाही सरकारमध्ये आहेत," असा घणाघात संजय राऊतांनी केला.

सावरकरांवर टीका करणारे सरकारमध्ये का?

सावरकरांच्या विचारांवरून भाजपवर निशाणा साधताना राऊत म्हणाले, “आम्ही सावरकरांचा विचार सोडला, असा आरोप केला जातो. मात्र मंत्री म्हणून सावरकरांचे विचार न मानणारा नेता सरकारमध्ये बसलेला आहे. सावरकरांवर टीका करणाऱ्यांना सरकारमध्ये का ठेवले आहे?” असा प्रश्न संजय राऊतांनी केला.

भाजप दुतोंडी गांडूळ आहे

भाजपच्या राजकारणावर टीका करताना त्यांनी “भाजप दुतोंडी गांडूळ आहे” असल्याचे म्हटले. एमआयएम आमच्या आसपासही नाही, असे म्हणत “फडणवीस-ओवैसी भाई-भाई आहेत,” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

भाजपने भारत काँग्रेसमुक्त करण्याची भाषा केली होती

यावेळी माध्यमांनी काँग्रेसनेही भाजपसोबत युती केल्याचा मुद्दा उपस्थित केला असता, “तेही चुकीचंच आहे. मी दोघांविरोधात बोलतोय. मात्र भाजपने भारत काँग्रेसमुक्त करण्याची भाषा केली होती, याचं मला आश्चर्य वाटतं,” असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

आता नाही तर कधीच नाही

सामना दैनिकाने घेतलेल्या ठाकरे बंधूंच्या मुलाखतीबाबत संजय राऊत म्हणाले, "ही मुलाखत महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राच्या जनतेची आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत काय म्हटलंय, "आता नाही तर कधीच नाही." तर हेच सत्य आहे, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प 'व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'; स्वतःच केले जाहीर; ट्रुथ सोशलवरील पोस्टने खळबळ

RTI अंतर्गत एनपीए, थकबाकीदारांची माहिती सार्वजनिक होणार? RBI च्या भूमिकेविरोधात ४ प्रमुख बँकांची CIC कडे धाव

जी-उत्तर : मुंबईतील महत्त्वाच्या राजकीय लढतींचा केंद्रबिंदू; तीन नवीन मेट्रो स्थानकांमुळे धारावी परिसराची शहराशी जोडणी अधिक सुलभ

...तर अमेरिकन, इस्रायली सैन्य लक्ष्य ठरेल; इराणचा सडेतोड इशारा

Thane Election : ठाण्यातील चार मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल