महाराष्ट्र

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उपकरणाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

Swapnil S

कराड : सातारा येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कराडपासून जवळच असलेल्या वहागाव, ता. कराड येथील अण्णाजी गोविंदराव पवार विद्यालयाचा दिव्यांग विद्यार्थी राज विठ्ठल साळुंखे यांच्या बहुउद्देशीय काठी या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला. भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. अमृतराव पवार, संस्थेचे सचिव राहुल पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत राज साळुंखेयाचा गौरव करण्यात आला. त्याच्या या उपकरणाची राज्य पातळीसाठी निवड करण्यात आली आहे. राज साळुंखे याला हे उपकरण तयार करण्यासाठी आयुष्मान पवार, पियुष पवार, शशांक पवार, नीतीराज पवार, राजवर्धन पवार जयदीप पवार, श्रेयस पवार, आर्यन पवार या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

राज साळुंखे याला विद्यालयातील विज्ञान शिक्षक अनंतकुमार गुरव यांचे विशेष सहकार्य तसेच सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. या कामी गटशिक्षणाधिकारी संमती देशमाने तालुका समन्वयक राजश्री घोडके नोडल टीचर विद्या सहस्त्रबुद्धे यांचेही सहकार्य लाभले. या यशाबद्दल मुख्याध्यापक धनंजय काळगावे पर्यवेक्षक निवास माने सर्व शिक्षक व परिसरातील मान्यवरांनी राज साळुंखे यांचे अभिनंदन केले. वर्षा झिमरे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस