शिवसेनेतील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आठ दिवसांपूर्वी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे संजय राऊतांनी त्यांना वाघीण म्हटले होते. मात्र आठ दिवसात शीतल म्हात्रेंनी पलटी मारली व शिंदे गटात सामील झाल्या. त्यामुळे आता या बाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. म्हात्रेंचे येत्या महापालिका निवडणुकीत निवडून येणे अशक्य आहे. त्यामुळे शिंदे गटात जाऊन भाजपचा आधार घेऊन महापालिकेत पोहोचण्यासाठी त्यांनी पक्षांतर केले असं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर ईडी आणि पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांनी असे केले असा देखील दावा केला जात आहे.
शीतल म्हात्रेंनी कालच शेकडो समर्थकांसह रीतसर शिंदे गटात प्रवेश केला. आता पर्यंत केवळ आमदारांनीच शिंदे गटात प्रवेश केला होता. महापालिकेतील शिवसेना केवळ मूठभर लोकांच्या हातात असल्याचे कारण देत त्या शिंदे गटात सामील झाल्या.
शीतल म्हात्रे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका २२ वर्षीय तरुणाला मारहाण केल्याचा आरोप आहे. ८ जुलै रोजी त्यांच्यावर याबाबत एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल केला आहे. या कारणामुळे त्यांना अटक होऊ शकते म्हणून देखील त्यांनी पक्षांतर केल्याचे सांगितले जात आहे.