महाराष्ट्र

शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत आज सुनावणी होणार की नाही?

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सलग दोन दिवस युक्तिवाद चालणार आहे. युक्तिवाद झाल्यानंतर यासंदर्भातील निकाल राखून ठेवला जाईल आणि तो सुप्रीम कोर्ट ठरवेल त्या दिवशी जाहीर केला जाईल.

Swapnil S

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सलग दोन दिवस युक्तिवाद चालणार आहे. युक्तिवाद झाल्यानंतर यासंदर्भातील निकाल राखून ठेवला जाईल आणि तो सुप्रीम कोर्ट ठरवेल त्या दिवशी जाहीर केला जाईल. मात्र, शिवसेनेची याचिका सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी ३७व्या क्रमांकावर असल्यामुळे याप्रकरणी सुनावणी होणार किंवा नाही, याविषयी साशंकता आहे.

३७ नंबरचे मॅटर सुनावणीसाठी येणे कठीण

ठाकरेंच्या शिवसेनेची कायदेशीर बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणारे ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी सांगितले की, “शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह. सुनावणीची तारीख बुधवारी सुप्रीम कोर्टात आहे, पण ३७ नंबरचे मॅटर सुनावणीसाठी येणे कठीण आहे. आता लोकांचा नवीन प्रश्न म्हणजे ‘जर एकनाथ शिंदेंकडून पक्ष चिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल?’ मला वाटते, शिंदे सेना भाजपमध्ये विलीन होईल आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्त्व एकदम कमी होईल. शिंदे सेनेतील अनेक जण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील आणि मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील. सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरू झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयच कधीतरी संपवेल.”

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा तर राष्ट्रवादी हा अजित पवारांचा पक्ष असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यानच सर्वोच्च न्यायालयाने अंतिम सुनावणीचे संकेत दिले होते. त्यामुळे आता या प्रकरणावर लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

WhatsApp च्या नव्या Username फीचरवर केंद्र सरकारची नजर; सायबर फ्रॉडचा धोका, 'मेटा' ला नोटीसची शक्यता

Navi Mumbai : नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात उतरला करंट; स्कुटीवरून जाणाऱ्या दोन विद्यार्थिनी जखमी, Video

ठाकरे गटाने उमेदवारी मागे घेतली; सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड

माहेरी गेलेली बायको परत आली नाही म्हणून मेहुणीलाच पळवलं; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

व्हेनेझुएलात भारतीय खलाशाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा, मेंदू, हृदयासह महत्त्वाचे अवयव गायब