PTI
महाराष्ट्र

सीईटी कक्षाच्या ‘अटल’ उपक्रमाला अल्प प्रतिसाद; सराव चाचण्यांसाठी २ हजार ५९५ विद्यार्थ्यांची नोंदणी

व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळखण्यासाठी मदत व्हावी यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ‘अटल’ उपक्रम सुरू केला आहे.

Swapnil S

मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळखण्यासाठी मदत व्हावी यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ‘अटल’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद लाभला आहे. सायकोमेट्रिक चाचणीसाठी २४३ विद्यार्थांनी, तर सराव चाचण्यांसाठी २ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेता यावा यासाठी सीईटी कक्षाने १६ जानेवारीपासून ‘सीईटी-अटल’ ही ऑनलाइन सेवा सुरू केली. या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या सराव चाचण्या आणि सायकोमेट्रिक चाचण्यांचा समावेश आहे. सराव चाचण्यांमुळे विद्यार्थ्यांना कोणत्या स्वरूपातील प्रश्नांना सामोरे जावे लागेल याची माहिती होईल. तसेच सायकोमेट्रिक चाचण्या वैयक्तिक क्षमता, स्वारस्य आणि योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी तयार केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘अटल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

अन्य सीईटीसाठी ९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

ही सेवा सुरू करून १५ दिवस उलटले तरी आतापर्यंत केवळ २ हजार ८३८ विद्यार्थ्यांनी ‘अटल’साठी नोंदणी केली आहे. यामध्ये सायकोमेट्रिक चाचणीसाठी २४३ विद्यार्थांनी, तर सराव चाचण्यांसाठी २ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मात्र यातील अवघ्या ३५४ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून नोंदणी केली आहे. दरम्यान, राज्यभरातून १९ वेगवेगळ्या विषयांच्या सीईटीसाठी ९ लाख २५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक