Sindhudurg : शिरोड्यात आठ पर्यटक बुडाले; तिघांचा मृत्यू ;१ अत्यवस्थ; चौघांचा शोध सुरू 
महाराष्ट्र

Sindhudurg : शिरोड्यात आठ पर्यटक बुडाले; तिघांचा मृत्यू ;१ अत्यवस्थ; चौघांचा शोध सुरू

शिरोडा-वेळागर येथील समुद्रात शुक्रवारी सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान ८ पर्यटक बुडाल्याची खळबळजनक घटना घडली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून चौघे जण बेपत्ता आहेत, तर एक जण अत्यवस्थ आहे. या दुर्घटनेत इसरा कित्तूर ही मुलगी बचावली असून तिला शिरोडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Swapnil S

सिंधुदुर्ग : शिरोडा-वेळागर येथील समुद्रात शुक्रवारी सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान ८ पर्यटक बुडाल्याची खळबळजनक घटना घडली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून चौघे जण बेपत्ता आहेत, तर एक जण अत्यवस्थ आहे. या दुर्घटनेत इसरा कित्तूर ही मुलगी बचावली असून तिला शिरोडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिरोडा येथील वेळागर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या कुडाळ-पिंगुळी येथील कित्तूर व मणियार कुटुंबातील सदस्यांवर शुक्रवारी काळाने झडप घातली. या समुद्रात या कुटुंबातील आठ जण पाण्यात बुडाले. या दुर्घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. बचाव पथकाला तीन व्यक्तींचे मृतदेह सापडले. तर कुटुंबातील एका मुलीला वाचवण्यात यश आले असून तिला पुढील उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेत फरहान इरफान कित्तूर (३४), इबाद इरफान कित्तूर (१३), नमीरा आफताब अख्तर (१६) यांचा मृत्यू झाला असून इसरा इम्रान कित्तूर (१७) ही बचावली आहे, तर इरफान मोहम्मद इसाक कित्तूर, इक्वान इमरान कित्तूर, फरहान मोहम्मद मणियार, जाकीर निसार मणियार हे चौघे जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनेमुळे कित्तूर व मणियार कुटुंबातील उर्वरित सदस्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

घटनास्थळी पोलीस, महसूल व ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा कार्यरत झाली असून प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे.

लहान मुलांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकार अलर्ट! ‘कोल्ड्रिफ’ सिरपवर बंदी; नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

अमेरिकेत आणखी एक भारतीय ठार; डलासमध्ये विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

महाराष्ट्रात ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; 'या' दिवसांमध्ये बाहेर पडताना घ्या काळजी, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

इटलीतील सुट्टीचा शेवटचा दिवस ठरला आयुष्याचा शेवट! नागपूरच्या हॉटेल व्यावसायिक दाम्पत्याचा अपघातात मृत्यू, तिन्ही मुलं जखमी

'पिंजऱ्याची चंद्रा’ काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन