महाराष्ट्र

तर कायदा आपले काम करेल- शंभूराज देसाई यांचा इशारा

Swapnil S

मुंबई : आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यांमुळे जर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होत असेल. गृहमंत्री पदासारख्या संवैधानिक पदावर बसलेल्या नेत्याच्या विरोधात वक्तव्य करुन आव्हान दिले जात असेल तर कायदा आपले काम करेल असा इशारा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिला. त्यांची सगळी वक्तव्य तपासली जातील. त्यांच्या सगळ्या वक्तव्यांची चौकशी केली जाईल आणि निश्चितपणे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे काही करावे लागेल ते आमचे पोलिस निश्चितपणाने करतील असेही त्यांनी स्पष्ट केले. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जरांगे पाटलांनी संयम पाळला पाहिजे. माझा त्यांना एक मित्रत्वाचा सल्ला राहील की त्यांनी आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे. स्वतःच्या सततच्या आंदोलनामुळे व उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीला थोडासा आराम मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी शांत डोक्यानं, शांत पद्धतीने विश्रांती घ्यावी. सरकार केव्हाही, कुणाबरोबरही चर्चा करायला तयार आहे त्यामुळे त्यांचं काय म्हणणं असेल आरक्षणाबाबत सरकारची चर्चा करावी सरकारची चर्चेची दारे नेहमीच खुली आहेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर महायुतीतील नेत्यांविरोधात एकेरी उल्लेख जरांगे पाटलांनी थांबवला नाही तर त्याला त्यांना त्याचे भविष्यात होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

Marathi Serial: लोकप्रिय मालिका 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' प्रेक्षकांपुढे येणार नवीन अवतारात!