प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Solapur : धक्कादायक! "कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे"; स्टोरी ठेवत तरुणाची आत्महत्या

सोलापूर शहराला हादरवणारी एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. विजापूर रोडवरील सुशील नगर परिसरात केवळ १८ वर्षांच्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

नेहा जाधव - तांबे

सोलापूर शहराला हादरवणारी एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. विजापूर रोडवरील सुशील नगर परिसरात केवळ १८ वर्षांच्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृत तरुणाचे नाव योगेश अशोक ख्यागे असे असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीतून व्यक्त केली वेदना

आत्महत्येपूर्वी योगेशने इंस्टाग्रामवर एक भावनिक स्टोरी पोस्ट केली होती. यात त्याने लिहिले होते, “मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचं आहे मला, जेणेकरून मी मेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे..!!” या मजकुरामुळे तो नैराश्यात असल्याचे समजते.

योगेश घरात एकटाच असताना त्याने टोकाचा निर्णय घेतला. त्याचे आई वडील नातेवाईकांकडे गेले असताना त्याने हे पाऊल उचलले. आई वडील घरी आल्यावर त्यांना योगेश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी त्याला तातडीने खाली उतरवून सोलापूर सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची

योगेश एका बेकरीत काम करून घराला हातभार लावत होता. त्याचे वडील वॉचमन म्हणून नोकरी करतात. योगेशने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसाकडून तपास सुरू आहे.

Bihar Politics : यादव कुटुंब कलह तीव्र; रोहिणी आचार्य यांचे गंभीर आरोप, म्हणाल्या, "घाणेरड्या शिव्या दिल्या, चप्पल उगारली...

न्यायालयाच्या वेळेचे मूल्य एक लाख! वेळ वाया घालविल्याबद्दल शेतकरी कुटुंबियाला दणका

कर्जतमध्ये क्रूरतेचा कळस! शेजारणीने केली अडीच वर्षांच्या चिमुरड्याची गळा आवळून हत्या, धक्कादायक कारण समोर

विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट! शालेय सहलींसाठी राज्य परिवहनच्या नवीन बसेस; भाड्यात तब्बल ५०% सवलत

ठाण्यात पाळीव प्राण्यांसाठी पहिली गॅस शवदाहिनी