संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

SSC Result 2025 : दहावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल; पुनर्मूल्यांकनासाठी ‘या’ सूचना वाचा

येत्या १५ मेपूर्वी निकाल जाहीर होणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत माहिती राज्य मंडळातर्फे कळविण्यात आली होती. या परीक्षेला राज्यातील १६.११ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यात ८.६ लाख मुले, ७.४७ लाख मुली आणि १९ तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश होता.

नेहा जाधव - तांबे

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) दहावीचा निकाल आज जाहीर झाला असून यंदा ९४.१०% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे यंदाही मुलींनी बाजी मारली असून ९६.१४% मुली, तर ९२.३१% मुले उत्तीर्ण झाली आहेत.

मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, राज्यातील आठ विभागांपैकी कोकण विभागाने ९८.८२% निकालासह प्रथम स्थान पटकावले. तर, नागपूर विभाग ९०.७८% निकालासह सर्वात मागे राहिला आहे.

राज्यातील १६.११ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी

येत्या १५ मेपूर्वी निकाल जाहीर होणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत माहिती राज्य मंडळातर्फे कळविण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या. या परीक्षेला राज्यातील १६.११ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यात ८.६ लाख मुले, ७.४७ लाख मुली आणि १९ तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश होता.

विभागनिहाय निकाल

कोकण - 98.82%

पुणे - 96.44%

मुंबई - 93.75%

कोल्हापूर - 96.12%

औरंगाबाद - 94.32%

अमरावती - 93.44%

लातूर - 92.67%

नागपूर - 90.78%

पुनर्मूल्यांकनासाठी मंडळाने केलेल्या सूचना

-ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची पडताळणी करायची आहे किंवा उत्तरपत्रिकांची झेरॉक्स कॉपी हवी आहे, ते त्यासाठी अर्ज करू शकतात. तसेच, ज्यांना पेपर पुन्हा तपासायचा आहे, म्हणजेच पुनर्मूल्यांकन करायचे आहे, ते अर्ज करू शकतात. गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ मे आहे. अर्ज भरताना Debit Card/ Credit Card/UPI/ Net Banking चा वापर करून शुल्क भरता येईल.

-उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा.

-ज्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा द्यायची आहे. त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ मे पासून सुरु होईल. "जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दिनांक १५ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत.

“यापुढे एकनाथ शिंदेंवर टीका झाली, तर..." ; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजनांचा ठाकरे बंधूंना इशारा

बांगलादेशातील हिंसाचारावर भारत आक्रमक; परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईची मागणी, "अल्पसंख्याकांच्या विरोधातील शत्रुत्व...

पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड! प्रशांत जगताप यांनी धरला काँग्रेसचा 'हात', पक्षाची ताकद वाढणार?

अवघ्या १० वर्षांच्या श्रवण सिंगला राष्ट्रपतींच्या हस्ते 'प्रधानमंत्री बाल पुरस्कार'; म्हणाला, "मला स्वप्नातदेखील...

"रुग्णालयानेच त्याला मारले": कॅनडामधील भारतीय व्यक्तीच्या पत्नीने सांगितला ८ तासांचा भयावह अनुभव