महाराष्ट्र

राज्य सरकार १८ सप्टेंबरला बांबू धोरण जाहीर करणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधत १८ सप्टेंबरला राज्य सरकार बांबू पॉलिसी जाहीर करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.‌

Swapnil S

मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून बांबूच्या झाडांची लागवड करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाचे जगभरातून स्वागत केले जात असून आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधत १८ सप्टेंबरला राज्य सरकार बांबू पॉलिसी जाहीर करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.‌

नरिमन पॉइंट येथील एनसीपीए सभागृहात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री सामंत म्हणाले.‌ मंत्रालय विधी मंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटेनियो गुटेरस यांनी वातावरण बदलाबद्दल सगळ्या जगाला अपील केले आहे. तापमान वाढीचे युग संपले असून होरपळ युग सुरू झाले आहे. या त्यांच्या आवाहनाला जगभरातून भारत देशाने आणि भारतामध्ये महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यासाठी पहिले पाऊल टाकले, असे सामंत म्हणाले.

मतदारच डिलीट केले! राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; आठवड्याभरात दुसरी घटना, पोलिसांकडून अलर्ट जारी

मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली

...म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य