महाराष्ट्र

भारत गौरव ट्रेनची यशस्वी गाथा! २२ जून रोजी पुण्याहून सुटणार महाराष्ट्रातील तिसरी ट्रेन

ही ट्रेन देशभरातील अनेक प्रतिष्ठित स्थळांचा समावेश करून आकर्षक प्रवासाला सुरुवात करेल.

कमल मिश्रा

मुंबई : पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि भारताचा सांस्कृतिक वारसा शोधण्यासाठी प्रवासी उत्साही लोकांना सुविधा देण्यासाठी, भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) भारत गौरव टुरिस्ट ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही ट्रेन देशभरातील अनेक प्रतिष्ठित स्थळांचा समावेश करून आकर्षक प्रवासाला सुरुवात करेल.

२२ जून, २०२३ रोजी पुण्याहून सुरू होणारी, भारत गौरव टुरिस्ट ट्रेन १ जुलै रोजी पुण्याला परतण्यापूर्वी उज्जैन, आग्रा, मथुरा, हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर आणि वैष्णोदेवी या गोलाकार मार्गाचा अवलंब करेल. हे ९ रात्र व १० दिवसीय पॅकेज पर्यटकांना या उल्लेखनीय स्थळांच्या समृद्ध, संस्कृती आणि अध्यात्मात स्वतःला विसर्जित करण्याची आयुष्यात एकदाच संधी देते. “या खास टूरसाठी निवडलेल्या प्रवाशांना विविध ठिकाणी ट्रेनमध्ये चढण्याची सोय असेल. नियुक्त केलेल्या बोर्डिंग थांब्यांमध्ये पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, सुरत आणि वडोदरा यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, वडोदरा, सुरत, वसई रोड, कल्याण, कर्जत, लोणावळा आणि पुणे येथे उतरण्यासाठी ट्रेन थांबे असतील,” असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

भारत गौरव रेल्वेसेवा आतापर्यंत मुंबईतून सुरू होती. मात्र आता ती सेवा पुण्यातूनसुध्दा सुरू झाली आहे. २८ एप्रिल रोजी पुण्यातून पहिली ‘भारत गौरव पर्यटक ट्रेन’ सोडण्यात आली. दुसरी गाडी ११ मे रोजी सुटली. त्यानंतर आता तिसऱ्या ट्रेनलाही नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभण्याची शक्यता आहे. ही ट्रेन १० दिवस देशातील मुख्य धार्मिक स्थळे दाखवणार आहे.

भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय रेल्वेने २०२१ मध्ये भारत गौरव योजना सुरू केली. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ आणि ‘देखो अपना देश’ या उपक्रमांतर्गत भारत गौरव पर्यटक ट्रेनचा शुभारंभ करण्यात आला. या डिलक्स एसी ट्रेनमध्ये एकूण १५६ पर्यटक प्रवास करु शकतात. यात १ एसी आणि २ एसी कोचची व्यवस्था आहे.

वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍यांच्या मते, भारत गौरव टुरिस्ट ट्रेन पर्यटकांना अनेक प्रमुख आकर्षणांना भेट देण्याची संधी देऊन समृद्ध प्रवास अनुभवाचे आश्वासन देते. ओंकारेश्वर मंदिर, महाकालेश्वर मंदिर, ताजमहाल, कृष्ण जन्मभूमी, गंगा आरतीसह ऋषिकेश, सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डर आणि पूज्य माता वैष्णोदेवी मंदिर यांचा या प्रवासात काही ठळक ठिकाणांचा समावेश आहे.

भारत गौरव योजना काय आहे?

भारत गौरव योजनेनुसार, कोणताही कंत्राटदाराला किंवा व्यक्तीला भारतीय रेल्वे भाड्याने घेता येणार आहेत. पर्यटन पॅकेज किंवा इतर सेवेसाठी भारतीय रेल्वेकडून किमान दोन वर्षासाठी भाड्याने घेता येणार आहे. दरम्यान सेवा देणाऱ्या खासगी कंपनीला मार्ग, थांबे, प्रदान केलेल्या सेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे.

दरम्यान, ट्रेन चालवण्यासाठी रेल्वे विभाग कर्मचारी, गार्ड आणि डब्यांसाठी बोर्डवरील देखभाल करणारे कर्मचारी प्रदान करेल. तसेच हाउसकीपिंग आणि केटरिंग व्यवस्था ज्या त्या खासगी कंपन्याकडून राबवण्यात येणार असल्याचं मंत्रालयाने सांगितलं आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा