महाराष्ट्र

मुदखेड तालुक्यातील नेवळीत युवकाची आत्महत्या

मृतदेह लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

Swapnil S

नांदेड : मुदखेड तालुक्यातील नेवळी येथे शेतीत लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना ८ रोजी रात्री घडली. सुनील बालाजी नेवळे (वय २६) असे मृताचे नाव आहे.

सुनील हा दि. ७ रोजी दिवसभर आपल्या घरातील दैनंदिन कामे आटोपुन रात्री ११ वाजता नेवळी परिसरातील शेतीत जातो, असे घरी सांगून गेला. मात्र तो सकाळी परत घरी न आल्याने त्याचे वडील शेतात गेले असता त्यांना सुनीलचा मृतदेह लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

ऐन 'ऑक्टोबर हिट'मध्ये पावसाचा झिम्मा! मुंबई परिसरात पावसाची संततधार; पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

नालासोपारा येथील एमडी ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त; छाप्यात १३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

डिजिटल युगातही 'खबरी' पोलिसांसाठी महत्त्वाचा; मानवी बुद्धिमत्तेची जागा तंत्रज्ञान घेऊ शकत नाही

२१ वे शतक भारत, आसियानचे! 'आसियान'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

'मोंथा' चक्रीवादळ उद्या आंध्र प्रदेशला धडकणार