(संग्रहित छायाचित्र) 
महाराष्ट्र

सुट्टी संपली; शाळांमध्ये आजपासून किलबिलाट

उन्हाळ्याच्या धम्माल सुट्टीनंतर राज्यातील शाळा शनिवारपासून पुन्हा मुलांच्या किलबिलाटाने गजबजणार आहेत.

Swapnil S

मुंबई : उन्हाळ्याच्या धम्माल सुट्टीनंतर राज्यातील शाळा शनिवारपासून पुन्हा मुलांच्या किलबिलाटाने गजबजणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा आनंदाचे वातावरण पसरले आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत करायला शाळांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत.

राज्यात शाळा सुरू होण्याची तारीख एकच असावी, या उद्देशाने गेल्यावर्षीपासून सरकारने १५ जून ही तारीख निश्चित केली आहे. मुलांना शाळेबाबत आपुलकी वाटण्यासाठी पालक, माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती आदींचे सहकार्य घेण्यात येत आहे.

शाळेत जाण्यासाठी नवी पुस्तके, वह्या, पेन्सील, पेन, गणवेश खरेदीसाठी शुक्रवारी बाजारात झुंबड उडाली होती. दरम्यान, राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी