देवेंद्र फडणवीस संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे-रोहित पवारांचा हात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्यात शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा हात होता.

Swapnil S

मुंबई : राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्यात शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा हात होता. या प्रकरणात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे आरोपी तुषार खरात याच्या संपर्कात होते. या प्रकरणाविरोधात जे व्हिडीओ तयार केले गेले, ते आधी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केला.

जयकुमार गोरे यांच्याविरोधात कटकारस्थान रचले गेले. षडयंत्र रचले गेले आणि त्यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला. या कटात महिला, तथाकथित पत्रकार आणि आणखी एक व्यक्ती सहभागी होती. दुर्दैव म्हणजे या कटात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा हात आहे. प्रभाकर देशमुख, खासदार सुप्रिया सुळे आणि या सभागृहाचे सदस्य रोहित पवार हे पत्रकार तुषार खरात यांच्या संपर्कात होते. हे त्यांना सतत कॉल करायचे आणि जयकुमार गोरे यांच्या विरोधात व्हिडिओ बनवल्यानंतर खरात हे व्हिडिओ सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवत होता, असे गंभीर आरोप फडणवीस यांनी केले.

क्लीनचिट दिल्यानंतरही गोवण्याचा प्रयत्न

जयकुमार गोरे याचे प्रकरण २०१७ चे होते. त्यावेळी ते आमच्या पक्षातही नव्हते. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना क्लीनचीट दिली. तरी काही लोकांनी त्यांच्याविरोधात षडयंत्र रचत त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला. राजकारण करावे आणि ते सगळेच करतात. परंतु एखाद्याची वैयक्तिक आणि कुटुंबाची बदनामी होईल आणि एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, असे राजकारण करू नये, असा सल्ला फडणवीस यांनी यावेळी विरोधकांना दिला.

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी! मिळणार ५०० चौरस फुटांचे घर; शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा