महाराष्ट्र

आम्ही मूर्ख आहोत का ? ; बावनकुळेंच्या वक्तव्याचे शिंदेगटावर परिणाम ?

बावनकुळे यांच्या वक्तव्याचा काहीही संबंध नाही. बावनकुळे यांना तसे अधिकार दिलेले नाहीत

नवशक्ती Web Desk

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युतीच्या जागा वाटपाबाबत विधान केले. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला (शिंदे गट) केवळ 48 जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे आता शिंदे गटातून प्रतिक्रिया उमटत असून, आमदार संजय शिरसाट यांनी बावनकुळेंना खडे बोल सुनावले आहेत. फक्त 48 जागा लढवण्यात आम्ही मूर्ख आहोत का? असे शिरसाट यांनी बावनकुळेंना सुनावले.

काय म्हणाले शिरसाट ?
यावर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, "बावनकुळे यांच्या वक्तव्याचा काहीही संबंध नाही. बावनकुळे यांना तसे अधिकार दिलेले नाहीत. त्यांना अधिकार कोणी दिले... अशा वक्तव्यामुळे युतीला लाज वाटते, याचे भान त्यांनी ठेवायला हवे. केवळ 48 जागा लढवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होऊन निर्णय होईल. त्यामुळे त्यांना तो निर्णय जाहीर करू द्या. बावनकुळे यांना कोणी अधिकार दिला? त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

काय म्हणाले होते बावनकुळे ?

विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढवेल, तर ४८ जागा शिंदे गटातील शिवसेनेला दिल्या जातील, असे बावनकुळे म्हणाले. बावनकुळे यांच्या याच वक्तव्यावर शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे बावनकुळे यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले आहे. 

स्वीकृत नगरसेवकांसह बदलणार समित्यांचे गणित; भाजप-शिंदे कोकण आयुक्तांकडे एकत्र नोंदणीची शक्यता

मीरा-भाईंदर पालिकेच्या महापौर व उपमहापौरांची ३ फेब्रुवारीला निवड

Mumbai : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५०० रुपये दंड; विभागीय शिस्तभंगाचीही कारवाई होणार

शिंदेसेनेला पाठिंबा नाहीच; KDMC तील नगरसेवकांना उद्धव ठाकरेंचा आदेश; मातोश्रीवरील बैठकीत निर्णय

जिल्हा परिषद निवडणुकीत 'कुटुंब रंगलंय राजकारणात'; रायगडमध्ये पती-पत्नी, सासू-सून उतरलेत निवडणूक रिंगणात