मुंबई : सीबीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांचे लक्ष राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या निकालाकडे लागले आहे. बारावीचा निकाल येत्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी जाहीर करण्याची तयारी मंडळाने केली आहे.
राज्यात बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत झाली. या परीक्षेसाठी एकूण १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. या परीक्षेचा निकाल तयार करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यानुसार मे महिन्यात या दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.