महाराष्ट्र

महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार! विजेत्याला महिंद्रा थार, तर उपविजेत्याला ट्रॅक्टर

महाराष्ट्र केसरी स्पर्धा ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत पार पडणार आहे

नवशक्ती Web Desk

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं बिगूल वाजणार आहे. भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी स्पर्धा ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत पार पडणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा मान मिळवणाऱ्या विजयी पैलवानाला महिंद्रा थार तसंच उपमहाराष्ट्र केसरी कुस्तीगीराला ट्रॅक्टर बक्षिस दिलं जाणार आहे.स्पर्धेचे स्वागताध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्थी बँकेचे सदस्य प्रदीप कंद यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे.

या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे, सरचिटणीस पै. योगेश दोडके आणि पै.विलास कथुरे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना स्पर्धेचे स्वागताध्यक्ष प्रदीप कंद म्हणाले की, ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेृचं उद्घाटन होणार आहे. या उद्धघाटनाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस आणि उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांची देखील उपस्थिती असणार आहे.

या स्पर्धेचं बक्षिस वितरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये साधारण ५० हजार प्रेक्षक क्षमता असलेले स्टेडियम उभारण्यात आल्याचं देखील कंद यांनी सांगितलं.

या स्पर्धेत ३६ जिल्हा आणि ६ महानगरपालिका असे एकूण ४२ संघ सहभागी होत आहेत. एका कुस्ती संघात गादी विभागातील १० आणि माती विभागीतील १० असे एकूण २० कुस्तीगीर २ मार्गदर्शक आणि १ संघ व्यवस्थापक असे एकूण २३ जणांचा समावेश असणार आहे. त्याच बरोबर या कुस्तीस्पर्धेत ८४० कुस्ती मार्गदर्शक आणि ४२ व्यवस्थापक,८० पंच आणि ५० पदाधिकारी असे एकूण ११०० जणांचा सहभाग असणार आहे, असं देखील कंद यांनी सांगितलं.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल बनला द्विशतकी विक्रमादित्य! अनेक विक्रमांना गवसणी; कोहली, सचिनचा रेकॉर्डही मोडला

चीनकडून नव्या डावपेचांची आखणी