महाराष्ट्र

हत्येच्या गुन्ह्यात परिस्थितीजन्य पुरावे नाहीत!हायकोर्टाचा निर्वाळा; पुण्यातील आरोपीला दोन वर्षांनी जामीन

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे गावात २४ जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्री ५६ वर्षीय अशोक भापकर यांची हत्या झाली.

Swapnil S

मुंबई : पुण्यात दारूच्या पार्टीवेळी झालेल्या वादातून मित्राची हत्या करणाऱ्या आरोपीला दोन वर्षांनी मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला. न्यायमूर्ती माधव जामदार यांनी हत्येच्या गुन्ह्यात परिस्थितीजन्य पुरेसे पुरावे नाहीत. केवळ आरोपी व मृत व्यक्ती हे दोघे घटनेपूर्वी एकत्र दिसले होते, याआधारे आरोपीला दीर्घकाळ तुरुंगात ठेवू शकत नाही, असे स्पष्ट करत जामीन मंजूर केला.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे गावात २४ जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्री ५६ वर्षीय अशोक भापकर यांची हत्या झाली. याप्रकरणी पोलिसांनी किरण झेंडेसह संजय भापकरला अटक करण्यात आली. गेली दोन वर्षे तुरुंगात असलेल्या किरण झेंडे आणि संजय भापकर या दोघानी ॲड. मुठा यांच्या मार्फत जामीनासाठी अर्ज केला.

त्या अर्जावर न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने ॲमिकस क्युरी म्हणून ॲड. रेश्मा मुठा यांची नेमणूक केली होती. सरकारी पक्षाने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केलेले नाही. कुठलाही थेट पुरावा वा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना तसेच खटल्यात प्रगती नसताना आरोपीला दीर्घकाळ तुरुंगात ठेवणे चुकीचे आहे, असा युक्तिवाद ॲड. मुठा यांनी केला. त्याची दखल घेत न्यायालयाने आरोपी संजय भापकरला २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले.

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

Jantar Mantar Assault Case : स्वतंत्र भारद्वाज अटकेत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

Mumbai Dahi Handi 2026 : मालाडमध्ये विटांचा खांब कोसळला; ७ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल