महाराष्ट्र

रेल्वे फाटक तोडून ट्रकची रेल्वे इंजिनाला धडक

तामिळनाडू येथील गव्हाने भरलेला ट्रक शुक्रवारी पहाटे मुक्ताईनगरकडून जात असताना बोदवडजवळ बंद असलेले रेल्वे गेट तोडून थेट एक्स्प्रेसवर जाऊन धडकला.

Swapnil S

जळगाव/प्रतिनिधी : तामिळनाडू येथील गव्हाने भरलेला ट्रक शुक्रवारी पहाटे मुक्ताईनगरकडून जात असताना बोदवडजवळ बंद असलेले रेल्वे गेट तोडून थेट एक्स्प्रेसवर जाऊन धडकला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी रेल्वेची वाहतूक मात्र ठप्प झाली आहे. तीन रेल्वेगाड्यांचा मार्ग बदलण्यात आला असून दोन पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत. घटनास्थळी रेल्वेचा आपत्कालीन विभाग, रेल्वे पोलीस व बोदवड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. येथे आलेल्या वृत्तानुसार, तामिळनाडूचा ट्रक क्रमांक टीएन५२-एफ-७४७२ हा शुक्रवारी पहाटे ४.४५

वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगरकडून बोदवडकडे गहू घेऊन जात होता. हा ट्रक रेल्वे ओव्हर ब्रिजवरून न जाता बंद असलेला रेल्वे गेट तोडून रेल्वेमार्गावर आला. त्याचवेळी अमरावती एक्स्प्रेस वेगात असल्याने तिने ट्रकला धडक देऊन ५०० मीटरपर्यंत ओढत नेले. या अपघातामुळे रेल्वे इंजिनाचे नुकसान झाले, तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.

अपघात एवढा भयानक होता की, रेल्वे इंजिनखाली अर्धा ट्रक अडकलेला होता. त्यामुळे इंजिनखाली अडकलेल्या ट्रकला काढण्यासाठी क्रेन, जेसीबी घटनास्थळी बोलवावे लागले. तसेच परिसरातील विद्युत पुरवठाही बंद करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र एक्स्प्रेस, नवजीवन एक्स्प्रेस, दुरंतो एक्स्प्रेस यांचे मार्ग बदलण्यात आले, तर भुसावळ बडनेरा व बडनेरा नारखेडाकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली, तर काही गाड्या वरणगाव, भुसावळकडे थांबवण्यात आल्या. या घटनेत कुणालाही दुखापत अथवा जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.

इंजिनखाली अडकलेला ट्रक कापून बाहेर काढला

गॅस कटरने ट्रक कापण्याचे काम सुरू करण्यात आले व जेसीबीच्या सहाय्याने ट्रक काढण्यात आला. या अपघातात रेल्वे इंजिनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यामुळे अमरावती एक्स्प्रेसला नवीन इंजिन लावण्यात जोडून गाडी मार्गस्थ करण्यात येणार आ

आनंदवार्ता! केरळमध्ये मान्सून दाखल; मुंबईत कधी बरसणार?

Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाला वेग; जुळ्या बोगद्यांसाठी TBM यंत्रणा उभारणी अंतिम टप्प्यात

'सॉरी आई बाबा... मी सगळं उद्ध्वस्त केलं’; NEET परीक्षार्थी विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाइड नोटमुळे हळहळ

Mumbai : एअर इंडियाची इमारत १५ ऑगस्टपासून सेवेत रुजू

पुणे विषारी दारू प्रकरणात नवी मुंबईतील बाप-लेक अटकेत; घातक रसायने पुरविल्याचे उघड, आतापर्यंत ३३३ जणांवर कारवाई