तुकाराम मुंढेंसह सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या (Photo- X)
महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंसह सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी मुंढे यांच्यासह सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.

पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय खंदारे यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे तर या विभागाचे आयुक्त श्रीधर डुबे यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे येथे करण्यात आली आहे.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब बेलदार यांची धुळे जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कान्हुराज बगाटे यांची महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे, तर कामगार विमा योजना आयुक्त आर. एस. चव्हाण यांची बदली हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे.

Weather Update : अर्ध्या देशात पुढील ६ दिवस उष्णतेची लाट

Pune : दगडूशेठ हलवाई गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

रेबीजग्रस्त, गंभीर आजारी कुत्र्यांना मारण्यास परवानगी; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, सर्व याचिका फेटाळल्या

Mumbai : औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी बंद

पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रति लिटर ९० पैशांची वाढ; पाच दिवसांतील दुसरी दरवाढ