महाराष्ट्र

तुळजाभवानी मंदिराचा कायापालट होणार; १,८६५ कोटींचा आराखडा तयार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

नवरात्रौत्सवात तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी स्मार्ट क्यू मॅनेजमेंट सिस्टीम, हिरकणी कक्ष, उद्यान विविध सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी १,८६५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : नवरात्रौत्सवात तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी स्मार्ट क्यू मॅनेजमेंट सिस्टीम, हिरकणी कक्ष, उद्यान विविध सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी १,८६५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी तुळजाभवानी मंदिर व शहराचा कायापालट करण्यात येणार आहे.

श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प तीन ते साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे प्रतिपादन परिवहनमंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजाभवानी देवी, तुळजापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे. देशभरातून दरवर्षी १ ते १.५ कोटी भाविक श्रीक्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात. तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने शासनाने तुळजापूर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या सर्व गोष्टी अंतर्भूत करण्यात आलेले आहेत.

हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी भूसंपादन, तांत्रिक मान्यता आणि विविध निविदा प्रक्रिया या गोष्टी समांतर पातळीवर करण्यात याव्यात अशा सूचना यावेळी मंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकारी, धाराशिव यांना दिल्या. प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी भक्त व पुजारी मंडळ यांच्याकडून तेथील धार्मिक प्रथा -परंपरांचा आदर राखत त्यांच्या सूचना अंमलात आणाव्यात अशा सूचना सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अष्टभुजा प्रतिमेला भक्तगणांचा विरोध

श्री क्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यांतर्गत १०८ फुटाचे शिल्प उभारले जाणार आहे. या शिल्पा मध्ये तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु हे दाखवत असताना तुळजाभवानी मातेची प्रतिमा ही अष्टभुजाकृती दाखवण्यात आलेली आहे. याला अनेक भक्तगण व पुजारी मंडळांनी आक्षेप नोंदवलेला आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video