महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आणखी दोन आत्महत्या; आरक्षण न मिळाल्यानं उचललं टोकाचं पाऊल..

राज्यात गेल्या महिन्याभरपासून अनेक तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचल आहे

नवशक्ती Web Desk

राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाज आंदोलन करत आहे. या आंदोलनाला राज्यात काही भागात हिंसक वळण आलं आहे, तर काही भागात अजून शांततेत आंदोलन सुरू आहे. तर काही तरूणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या देखील केली आहे. राज्यात गेल्या महिन्याभरपासून अनेक तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचल आहे.

अशातचं आता मराठा आरक्षणासाठी आणखी दोन तरूणांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. संगमनेर तालुकत्यातील एका तरूणानं आत्महत्या केली आहे. घराच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सागर वाळे असं या तरूणाच नाव होतं. त्याचं वय २५ होतं. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. 'आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा', आरक्षण नाही त्यामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यानं सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे.

तर दुसरी घटना छत्रपती संभाजीनगर घडली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पोखरी गावातील एका तरुणान मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची माहिती समोर येतं आहे. शुभम अशोक गाडेकर रा. कोलठान यान गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.पोखरी शिवारात त्यानं मराठा आरक्षणासाठी झाडाला गळफास घेऊन २३ वर्षीय तरूणानं आत्महत्या केली आहे. शुभम हा एमपीएससी या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. या दोघांच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातं आहे.

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समावेशाकडे लागले लक्ष... युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर केलेली बदली रद्द; सहाय्यक प्राध्यापक महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा

भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा

हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट; शुल्क कमी न केल्यास ‘हॉटेल बंदचा’ व्यावसायिकांचा इशारा