महाराष्ट्र

"डॉक्टरांचा दोष नाही, कोरोनाकाळत हीच...", उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

गोव्यात, सुरतला, गुवाहाटीला जाऊन मौज मजा करायला, टेबलावर नाचायला पैसे आहेत. मात्र, औषधे खरेदी करायला यांच्याकडे पैसा नसल्याचं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

नवशक्ती Web Desk

राज्यातील नांदेड, ठाणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेल्या शासकीय रुग्णालयात मृत्यूंवर राज्याचं वातारण ढवळून निघालं आहे. यावर ठाकरे गटाने नेते आणि राज्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राज्यात कोरोना काळात देखील औषधांचा तुटवडा झाला नसल्याचं सांगिलतं. तिच आरोग्य यंत्रणा असून आता राज्याची आरोग्य यंत्रणा कमकुत झाली असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

नांदेडचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांडेड रुग्णालयाचे डीन यांना शौचालय स्वच्छ करायाल लावलं यावरुन प्रश्न उपस्थित केलं. ते म्हणाले की नांडेच्या डीनला शौचालय साफ करायला लावलं तर इतर रुग्णालयांच्या डीनवर कारवाई का नाही? अॅट्रॉसिटी दाखल केली म्हणून दबाव वाढवण्यासाठी नांडेच्या डीववर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे का? अशी संखा देखील त्यांनी उपस्थित केली. गोव्यात, सुरतला, गुवाहाटीला जाऊन मौज मजा करायला, टेबलावर नाचायला यांच्याकडे पैसे आहेत. मात्र, औषधे खरेदी करायला यांच्याकडे पैसा नाही. असा खोचक सवाल देखील त्यांनी राज्य सरकारला केला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री सहायत्ता निधी कक्षातून कुणाला मदत होतेय,ती बिले कुणाला मिळतायेत याचीही चौकशी व्हायला हवी. शासकीय औषधे निविदेशिवाय काढणार आहेत. त्याची देखील चौकशी झाली पाहीजे अशी मागणी ठाकरे यांनी केली.

शिवसैनिकांना आवाहन

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिक, पदाधिकारी यांना आवहान करतो आपापल्या जिल्ह्यात, तालुक्यात शासकीय रुग्णालयात जाऊन तिथल्या डॉक्टरांना विश्वासात घेऊन औषधे किती पोहचली, कधीपासून औषधांचा तुटवडा आहे याची माहिती घ्या. असं आवाहन केलं.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?