ANI
ANI
महाराष्ट्र

येत्या 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी

वृत्तसंस्था

काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील विविध राज्यांसाठी पुढील 5 दिवस पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने (IMD) म्हटले आहे की कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण होऊ शकते. यासोबतच हवामान खात्याने नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

मुंबईत पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी

बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासांत तीव्र होण्याची शक्यता असल्याने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांसोबतच मुंबईसाठी 8, 9 आणि 10 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तीनही दिवस 100 मिमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, सध्या कोकणातही मुसळधार पाऊस पडत आहे. विविध ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गुहागर तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे.

दरम्यान, राज्याच्या विविध भागात सध्या चांगला पाऊस पडत आहे. विशेषतः मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेडसह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे पाऊस पडत आहे. मुंबईतही चांगला पाऊस झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटजी तालुक्यातील परवा आणि साखरा मंडळातही जोरदार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

विदर्भात पुढील तीन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भासाठी पिवळा अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 9 आणि 10 ऑगस्ट रोजी मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण