महाराष्ट्र

२० कोटींची जलवाहिनी सहा महिन्यांतच फुटली

Swapnil S

लासलगाव : सुमारे २० कोटी रुपये खर्च करून सहा महिन्यांपूर्वी केलेली नवीन जलवाहिनी फुटल्याने लासलगावसह इतर १५ गावांना ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून नळाला पाणीच न आल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या सततच्या पाइपलाईन फुटणे, वीज पुरवठा तोडणे, या कारणामुळे नांदुर मध्यमेश्वर धरणात मुबलक पाणीसाठा असूनही लासलगांवकराना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महिन्यातून केवळ तीन ते चार वेळेस गावाला पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

नवीन पाइपलाईनसाठी २० कोटी रुपये खर्च करून सदरची योजना सहा महिन्यांपूर्वी मोठ्या दिमाखात सुरू झाली मात्र पुन्हा नवीन आणि जुनी पाइपलाईन फुटल्याने गावाला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरातील नागरिक ऐन कडक उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असून पाण्यासाठी १० ते १२ दिवस आतुरतेने वाट पहावी लागत आहे. तब्बल १० ते १२ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहे.

नवीन झालेली पाइपलाईन सहा महिन्यांतच फुटल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. पाणीटंचाईसाठी महावितरणाची बत्ती गुल होणे, मोटारी जळणे आदी कारणे गेल्या काही वर्षांपासून समोर येत आहेत. मात्र इतकी वर्षे उलटूनही आणि नवीन पाइपलाईन सुरू होऊन पाणी समस्येचे ग्रहण सुटलेले नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

-सचिन आत्माराम होळकर, सरचिटणीस, नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल