महाराष्ट्र

"जेवण सुरु होतं, अचानक स्फोटाचा आवाज आला, अन्..." डोंबिवली स्फोटातील प्रत्यक्षदर्शीनं काय सांगितलं?

अमुदान केमिकल्स या कंपनीच्या परिसरातील गणेश भुवन नावाचं एक हॉटेल आहे. या स्फोटानंतर या हॉटेलचंही नुकसान झालं आहे. हॉटेलच्या मालकांनी सांगितलं की...

Suraj Sakunde

मुंबई: डोंबिवली MIDC मधील अमुदान केमिकल्स कंपनीत आज दुपारी १ः३० वाजताच्या सुमारास स्फोट होऊन ६ जणांचा मृत्यू तर ४८ जण जखमी झाले आहेत. दरम्यान स्फोट झालेल्या अमुदान केमिकल्स कंपनीच्या परिसरातील असणाऱ्या एका हॉटेल मालकांनं नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे.

"जेवण सुरु होतं अन् अचानक आला स्फोटाचा आवाज...

अमुदान केमिकल्स या कंपनीच्या परिसरातील गणेश भुवन नावाचं एक हॉटेल आहे. या स्फोटानंतर या हॉटेलचंही नुकसान झालं आहे. हॉटेलचं छत तुटून आत आलं. यात हॉटेलमधील साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे. मालक योगेश भट यांनी सांगितलं की, "२० ते २५ ग्राहक इथं जेवण करत होते आणि ८ कर्मचारी त्यांना सेवा देत होते. दरम्यान अचानक मोठा आवाज झाला. आम्हाला वाटलं की भूकंप झालाय, म्हणून आम्ही ग्राहकांना तातडीनं हॉटेलमधून बाहेर पडायला सांगितलं. या धावपळीत दोन ग्राहक किरकोळ जखमी झाले."

रेस्क्यू ऑपरेशन सुरु: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, "डोंबिवली स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तिथं आता रेस्क्यू ऑपरेशन आहे. स्वतः खासदार, जिल्हाधिकारी आणि त्यांची टीम तिथं आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे."

शेजारच्या कंपन्यांचंही नुकसान-

डोंबिवली एमआयडीसीतील आग दुर्घटनेमुळं अमुदान कंपनीच्या शेजारच्या कंपन्यांचं मोठं नुकसान झालं. अमुदान कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा साठा ठेवला होता. त्याचं योग्य प्रकारे निरीक्षण होत नव्हतं, असा आरोप शेजारील कंपनीचे मालक डॉ.शेवडे यांनी केला.

शेतकऱ्यांचा राजा : राजर्षी शाहू महाराज

आजचे राशिभविष्य,२७ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला ब्रेड टोस्ट; मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल

केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, "अत्यंत धक्कादायक, मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते?"

खर्चात मोठी वाढ; मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये ५.४ लाख कोटींची भर