मुंबई

मुंबईत ‘लाडकी बहीण’ योजनेत १ लाख ३० हजार महिला पात्र; जिल्हाधिकारी संजय यादव यांची माहिती

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मुंबई शहर जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २८ महिलांचे अर्ज आले असून त्यापैकी १ लाख ३० हजार ९७१ अर्ज पात्र झाले आहेत.

Swapnil S

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मुंबई शहर जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २८ महिलांचे अर्ज आले असून त्यापैकी १ लाख ३० हजार ९७१ अर्ज पात्र झाले आहेत. अधिकाधिक पात्र महिलांनी अर्ज करावेत असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत यादव बोलत होते. या पत्रकार परिषदेला उपजिल्हाधिकारी तथा माझी लाडकी बहीण योजनेचे समन्वय अधिकारी गणेश सांगळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड, समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुंबई शहर जिल्ह्यामध्ये वॉर्ड स्तरावर एकूण ७५ मदत केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ९ वॉर्डमधील ५२ प्रभागांमध्ये ७४ मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. अर्जाची छाननी करण्यासाठी अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका व बृहन्मुंबई महानगरपालिका यंत्रणा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई शहर कार्यालयातील यंत्रणा यांनी छाननीचे काम सुरू केले आहे. यासाठी डी वॉर्ड येथे व एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या अंतर्गत १ वॉर रूम महिलेची स्थापन करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी यावेळी दिली.

'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना'

युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा अशी ही योजना आहे. त्यांना यासाठी आर्थिक मदत म्हणून विद्यावेतन देण्यात येणार आहे. बारावी पास विद्यार्थ्यांना प्रतिमाह ६ हजार, आयटीआय किंवा पदविका धारक उमेदवारांना ८ हजार, पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांना प्रतिमाह रुपये १० हजार असे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात डीबीटी ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येणार आहे.

“यापुढे एकनाथ शिंदेंवर टीका झाली, तर..." ; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजनांचा ठाकरे बंधूंना इशारा

बांगलादेशातील हिंसाचारावर भारत आक्रमक; परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईची मागणी, "अल्पसंख्याकांच्या विरोधातील शत्रुत्व...

पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड! प्रशांत जगताप यांनी धरला काँग्रेसचा 'हात', पक्षाची ताकद वाढणार?

अवघ्या १० वर्षांच्या श्रवण सिंगला राष्ट्रपतींच्या हस्ते 'प्रधानमंत्री बाल पुरस्कार'; म्हणाला, "मला स्वप्नातदेखील...

"रुग्णालयानेच त्याला मारले": कॅनडामधील भारतीय व्यक्तीच्या पत्नीने सांगितला ८ तासांचा भयावह अनुभव