प्राथमिक फोटो
मुंबई

अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर, ५३ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश: १५ हजार ८१२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारी सकाळी ऑनलाइन जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये ५३ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारी सकाळी ऑनलाइन जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये ५३ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. १५ हजार ८१२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय प्राप्त झाले आहे.

प्रवेश यादीमध्ये विद्यार्थ्यांना कोणते महाविद्यालय मिळाले, ते त्यांच्या लॉगिनमध्ये जाऊन ‘चेक ॲलॉटमेंट स्टेटस’ या ऑप्शनमध्ये तपासून पाहता येणार आहे. विद्यार्थांना ॲलॉटमेंट झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश हवा असल्यास विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिनमध्ये जाऊन ‘अपलोड रिक्वाइड डॉक्युमेंट’ या ऑप्शनवर क्लिक करून आपले कागदपत्रे अपलोड करावेत. तसेच आपली सहमती दर्शवून ‘प्रोसेस्ड फॉर ॲडमिशन’ या ऑप्शनवर करून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन आपला प्रवेश निश्चित करून घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांस पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय ॲलॉट झाले असल्यास वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमाच्या २ ते १० क्रमांकामधील कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय ॲलॉट झाले आहे, त्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा.

तिसऱ्या गुणवत्ता यादीचा सारांश

  • एकूण उपलब्ध जागा : १ लाख ७० हजार ८६०

  • तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी एकूण प्राप्त विद्यार्थी : १ लाख ५३ हजार ८८८

  • तिसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये एकूण अलोटमेंट विद्यार्थी : ५३ हजार ५४

  • पहिल्या पसंतीक्रमांचे कनिष्ठ महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी :१५ हजार ८१२

  • दुसऱ्या पसंतीक्रमांचे कनिष्ठ महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी : ८ हजार ४३३

  • तिसऱ्या पसंतीक्रमांचे कनिष्ठ महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी : ७ हजार ०३३

तिसऱ्या यादीत ॲलॉटमेंट जागा

शाखा उपलब्ध जागा अलॉटमेंट जागा

कला २५८२३ ४३३२

वाणिज्य ८९०३७ ३१५५८

विज्ञान ५३५२० १६९१४

एचएसव्हीसी २४८० २५०

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला