मुंबई

येरवडा कारागृहातील कैद्यांनी बनवल्या ९० हातमाग बेडशीट्स

या बेडशीट्स आज १५ ऑगस्ट रोजी सीएसएमटी ते निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या पहिल्या एसी कोचमध्ये प्रवाशांना दिल्या जाणार

प्रतिनिधी

स्वातंत्र्य दिनानिमित्त मध्य रेल्वेने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या ९० हातमाग बेडशीट्स प्रशासनाने घेतल्या आहेत. या बेडशीट्स आज १५ ऑगस्ट रोजी सीएसएमटी ते निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या पहिल्या एसी कोचमध्ये प्रवाशांना दिल्या जाणार आहेत. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हातमागांना चालना देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार देशभरात विविध कार्यक्रमांचे, उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून देखील विविध कार्यक्रम आयोजित केले असताना एक अनोखा उपक्रमही रेल्वेकडून राबवण्यात येणार आहे.

आजच्या स्वातंत्र्यदिनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकापर्यंत सुरू होणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसच्या प्रथम श्रेणीच्या वातानुकूलित डब्यातील प्रवाशांना बेडशीट पुरवल्या जाणार आहेत. या बेडशीट्स पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या आहेत.

दरम्यान, यासाठी कस्टम मेड बेडशीटची तरतूद करण्यात आली असून हे ऑर्डरवर बनवले गेले नाहीत, तर थेट आमच्या विक्री सेलमधून खरेदी केले गेले. याची पर्वा न करता आम्हाला आनंद आहे की, आम्ही मध्य रेल्वेच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात एक वेगळी भूमिका बजावत असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस