मुंबई

ट्रकची धडक लागून ३० वर्षांच्या तरुणाचा मृत्यू ; आरोपी ट्रकचालकाचे पलायन

पोलिसंनी जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने जवळच्या कूपर रुग्णालयात दाखल केले

नवशक्ती Web Desk

मुंबई- ट्रकची धडक लागून झालेल्या अपघातात हरे राम शर्मा या ३० वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळाहून पळून गेला असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी हलगर्जीपणाने ट्रक चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. हा अपघात शनिवारी रात्री उशिरा पावणेतीन वाजता अंधेरीतील जेव्हीएलआर, कमल अमरोही बसस्टॉपजवळील वेदांतंत पेट्रोल पंप, जोगेश्‍वरीकडे जाणार्‍या वाहिनीवर झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. वेदांत पेट्रोलपंपजवळ अपघात झाल्याची माहिती प्राप्त होताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तानाजी दडेकर हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी रवाना झाले होते. तिथे गेल्यानंतर काही लोकांनी एका भरवेगात जाणार्‍या ट्रकने जखमी व्यक्तीला धडक दिल्याचे सांगितले. अपघातानंतर जखमीला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती न देता चालक पळून गेला होता. त्यामुळे पोलिसंनी जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने जवळच्या कूपर रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्याकडे सापडलेल्या कागदपत्रावरुन त्याचे नाव हरे शर्मा असल्याचे उघडकीस आले. तो नवी दिल्लीतील सुलेमाननगर, अंगर इंक्लेव्ह अपार्टमेंटचा रहिवाशी आहे. त्याच्या अपघाती मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबियांना कळविण्यात आली आहे. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात ाअला आहे. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेल्याने त्याचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले.

भारतावर आता ५०० टक्के टॅरिफ? ट्रम्प प्रशासन 'रशियावरील निर्बंध' विधेयकाद्वारे पुन्हा झटका देण्याच्या तयारीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास; “मुंबईचा महापौर मराठी हिंदू...

"हॉटेलमध्ये बोलावले अन्..."; अल्पवयीन नेमबाज युवतीचा राष्ट्रीय प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

पर्यावरणासाठी झगडणारं नेतृत्व गमावलं! प्रख्यात पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांचं निधन

Bigg Boss Marathi 6 : श्रेयस तळपदे जाणार 'बिग बॉस'च्या घरात? अभिनेत्याने स्वतःच सांगितलं, "लोक प्रसिद्धीसाठी काहीही करतात"