मुंबई

३९ लाखांची रोख रक्कम नोकराने पळविली

दिलीप मोतीलाल जैन (५९) हे व्यावसायिक असून, जून २०२३ पासून त्यांच्या व्यवसायातील जमा झालेली ३९ लाख ६२ हजाराची कॅश त्यांनी त्यांच्या राहत्या घरी ठेवली होती.

नवशक्ती Web Desk

मुंबई : व्यावसायिकाच्या घरातील सुमारे ३९ लाखांची कॅश त्यांच्याच नोकराने पळवून नेल्याची घटना काळाचौकी परिसरात घडली. याप्रकरणी राजकुमार रामचंद्र मंडल या नोकराविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. राजकुमार हा मूळचा बिहारच्या फतेहपूरचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिलीप मोतीलाल जैन (५९) हे व्यावसायिक असून, जून २०२३ पासून त्यांच्या व्यवसायातील जमा झालेली ३९ लाख ६२ हजाराची कॅश त्यांनी त्यांच्या राहत्या घरी ठेवली होती. या कॅशबाबत त्यांच्या घरी काम करणाऱ्या राजकुमार मंडलला माहिती होती. राजकुमार हा गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्याकडे घरगडी म्हणून कामाला लागला होता. पर्युशण पर्व असल्याने गुरुवारी सकाळी पावणेदहा वाजता ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत इमारतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थनेसाठी गेले होते. ते घरी आले तेव्हा त्यांना राजकुमार घरी दिसला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी कपाटातील कॅशची पाहणी केली असता, त्यात ३९ लाख ६२ हजाराची कॅश नव्हती. ही कॅश घेऊन राजकुमार हा पळून गेल्याचे लक्षात येताच त्यांनी काळाचौकी पोलिसांना ही माहिती दिली.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

इराणमध्ये नोकरी शोधताय? तर, सावधान! भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा

बेताल वक्तव्यावरून वाद; पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून नोंदविला आक्षेप